Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ३२.
१७०३ श्रावण वद्य ११.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे. राजश्री बाळाजी गोविंद यांजकडून विसा हजारांचे जागिरीचे कमतिचें ऐवजीं रुपये दहा हजार देविले. त्यास लिहितां व कारकून पाठवितां थकलों. परंतु कवडी खर्च न पाठवीत. यास्तव येथून उलगडा पाडून स्वामीपासीं येणें दुस्तर जालें आहे. आपण कृपा करून त्यांचे वकिलास तेथेंच ताकीद होऊन रुाा घेऊन पाठवाल तर जीवनोपाय. होईल तें करणार स्वामी समर्थ आहेत. व राजश्री रघुनाथ हरि यांजकडून सालाबाद पांचा हजारांचे नेमणुकीचे रुाा xxxxx यांनीं या ऐवजास गांव लावून दिल्हे होते त्या xxx नें वसूल होत होते. ते घेऊन आजपावेतों सरकारांत विनंती न केली. हाली मारनिलेनीं गांव जप्त केले. त्यावरून सरकारांत विनंति लिहिली. सरकारांतून मारनिलेचें नांवें ताकीदपत्र आलें तें त्यांजकडे पाठविलें. त्यांनीं साफ उत्तर दिल्हे कीं, झांसी तालुक्यापैकीं परगणे राा पाटीलबावाकडे गेले, आता राहिला मुलूक तो आह्मास किल्ल्याचे खर्चासच पुरत नाहीं तेव्हां सरकारच्या नेमणुका आह्मीं कोठून द्याव्या ? याविषईंची पत्रें हुजुरांतून पाठविलीं आहेत. तेथें xxxx नेमणूक करार होऊन येईल त्याप्रों xxxx धातुपोषणाची बोलणीं बोलून आमचे कारकुनास व माणसास बिदा करून दिधले. त्यास, या दिवसांत बुंदेले व झांसीकर आपणास जसे अवघे राजेरजवाडे तैसे आपण आपल्याच मोजितात व नानाप्रकारें वल्गना करितात. त्याचा तपसील पत्रीं काय ल्याहावा ? तर कृपा करून बुंदेल्याकडील व झांसीकराकडील हजूरचे बंदोबस्त करून ऐवज घेऊन शेवकास पाठवितील तर येथील गुंता उरकोन. चरणदर्शन-लाभ घडेल ते करणार आनाथाचे नाथ आपण आहेत. कृपा करून उत्तरीं पालन करावयास स्वामी समर्थ आहेत. दर्शन-लाभ होय तो सुदिन. हे विनंति.