Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १५९.
१६९८ वैशाख.
यादी
१ सहा लक्षांचे जवाहिराचा मजकूर.
१ जनराल खर्चास काय देतील त्याप्रोंच द्यावें.
१ सिबंदीस निदानीं पंचवीस लक्ष... पाहिजेत. तेव्हां रुाा चा... अर्धा देऊं... त्यास जवाहीर मागोन घ्यावें. गहाण ठेऊन कर्ज रुपये घेऊन पाठवणें.
१ कंपनीचे जाग्यांत राहिल्यास पेंच न पडे ते जनरालांनीं करावें. आह्मीं येऊं अथवा सुरत भडोचेस राहूं. आणि बाळास व सदाशिव रामचंद्रास पाठऊं.
१ जनरालाखेरीज दुसरा आश्रय भूमंडळीं नाहीं.
१ पोटाचें संकट. जनावरास पाव चंदी देतों.
१ भडोचेस रहावें. पाव कोस अर्ध कोसावर राहावेसें मानस आहे.
१ धवशाचें राजकारण व जाल्यास मुंबईस येतों.
१ सिबंदीविसीं ल्याहावें. कोठें राहावें ऐसें जनरालांनीं लिहीत जावें.
१ अपटणाचीं पत्रें पाठविली. त्यांची मसुदा जनरालास दाखवावा.
१ लाख रुपये कर्ज पाठवणें. ह्मणजे येथें रोजमरा फौजेस देऊं. इतर धरणीं पारणीं होतील.
१ कोकणचे मार्गें हैदराकडे जावें तरी वाट अवघड; फौज न निभावे. तथापि विचार करून पाहतों.
येकूण पत्रें २.