Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १५८.
१६९८ वैशाख शुद्ध १०.
पुरवणी राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि:-
सुहुरसन सीत सबैन. मुंबईकर जनराल व कोशलदार याणीं आमची मसलत धरिली. त्या कराराप्राणें सिद्धीस न्यावी. बंगाल्याच्या बंदीचा हुकूम आला तो याणीं न ऐकावा आणि केलें कार्य सिद्धीस न्यावें, हिम्मतीनें हा तोर राखावा, तें याच्यानें न जाहालें. तस्मात हिम्मतीचे कोते, ही गोष्ट अनभवानें कळोन आली. असो ! हालीं कलकत्त्याची परवानगी आली अझून तरी जलदी करून मसलत सिद्धीस न्यावी. तूर्त सवड आहे. हेही न होय, तेव्हां यांच्या करण्याची तारीफ काय करावी, हें कळतच आहे. तिसरा पक्ष: तूर्त खर्चास दोन चार लाख परुये घ्यावे, ह्मणजे आह्मी दोन चार महिने ढकलूं. त्यास आमचाच ऐवज याजकडे आहे. जवाहीर सव्वा सहा लक्षाचें अनामत व फत्तेसिंगाबद्दल कारनेलीकडे अडीच लक्ष व कित्ता फत्तेसिंगाकडील कारकून तेरा लक्ष म्हणून सांगतात. त्यांतील तीन लक्ष, येकूण साडेपांच लक्ष. याप्रमाणें बारा लक्षांचा ऐवज आमचाच आहे. त्यांपैकीं द्यावे अथवा तूर्त कर्जदाखल रुपये द्यावे. ह्मणजे फौजेस थोडेबहुत देऊन चार दिवस निभाऊं. कांहींच न होय, तेव्हां लाचारीस्तव बारभाईकडे सलूकाचा संदर्भ लावावा लागेल. परंतु इंग्रेज जनराल मुंबईकर यास खातरजमेनें मसलत सिद्धीस न्यावी हा अभिमान असल्यास, कोणताही विचार जलदीनें करावा. एक तूर्त मसलत जलदीनें सिद्धीस न्यावी अथवा खर्चास द्यावें, ह्मणजे चार दिवस काढावयास येतील. हें कांहींच न होय, तेव्हां पुढें करतील हें कळतच आहे. सलूक करणें प्राप्त जाहाला. त्यासही इंग्रेज दरम्यान लागतील. सबब आधीं बोलून ठेवणें. सर्व गोष्टी इंग्रजांचे बलावर आहेत. बारभाईसी सलूख कसा घडतो ? उभयपक्षीं तोड काय राहिली ? हें तुह्मांस कळतच आहे. लाचारीस उभे. गुजराथेवर तोंड पडल्यास तूर्त मसलत गा ++ ऐसे मनांत आहे. परंतु फितुरी दाहाखेरीज ऐकणार नाहीत. इंग्रजी सरंजाम माघारा सुरतेस येऊन राहिला तो बाहेर लष्कराचे राहून, पांच सात कोस कूच केलें तरी तेंही तोड पडेल. तूर्त इंग्रज माघारे फिरले, बंगालियाहून परवानगी आली, अैसे वर्तमानावरच फडके वगैरे घाबरे जाले आहेत आणि सलुख्याचें राजकारण कृष्णराव बळवंत यांणीं राजश्री सखाराम हरीचें मार्फतीनें लाविलें आहे. त्यांसी नाद लाविलाच आहे. परंतु दाहाविना तेंही शेवटास जाणें संकटच आहे. सर्वप्रकारें तूर्त गळाठा पोटाविना मसलतीचा झाला आहे. येथें सुरतेस बहुत प्रेत्न केला. परंतु लाख पन्नास हजार रुपये कर्जवामही मिळेना. यामुळें लाचार झालों आहों. गायकवाडाकडील ऐवजाचा व पावतीचा मजकूर तुम्हांस विस्तारें पूर्वीं लिहिलाच आहे. पावती दिली तरी त्यांत दरजा फार ठेविल्या आहेत, न द्यावी हे गोष्ट प्रमाण. परंतु येथील लाचारी व वक्तसमय ! करनेलीविना उपाय नाहीं. ऐसे समजोन गुणदोष पाहून केलें आहे. कसाही ताठा जाला आणि याणीं मसलत शेवटास नेली म्हणजे अवघड नाहीं व त्याशीं वादहि सांगणें नाहीं. मसलतीपुढें दाहापांच लक्षांचे कमजास्तही पेंच नाहीं, ऐसें समजोनच केलें. पावती दिलीं असतां मसलतीस री ठिकाण नाहीं आणि दिवसेंदिवस उदास व रुष्टताच कर्नेल दाखवितात ! सरकारतर्फेनें सरळतेस गुंता नाहीं. अस्तु ! तूर्त पंचाईतीसी प्रयोजन नाहीं. भलते प्रकारें लाख दोन लाख रुपये मिळालियास मसलतच मारतों, ऐशी उमेद धरितों. प्रेत्न होईल तो करणें. जाणिजे. छ ९ रबिलावल.
(लेखनावधि:)