Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

लेखांक १५४.

१६९८ वैशाख शुद्ध ६.

वर्ष सहा महिने गुतरातेवरच तह पडला तरी कबूल करावा लागेल. तेव्हां, इंग्रेजांकडील पा। माघारे द्यावे ऐसा तह आपटणानें ठराविला आहेच. त्याप्रों सारे पा। आमच हवालीं करावे. परगणेयाची स्मरणानें नांवनिसी नेहमी दिल्हे होते.: -
१    उर्पाड
१    जंबुसर
१    आमोद मागाहून मेस्तर शाहानें करून घेतले.
१    आंकलेश्वराचे दरसाल उकते पाहण लक्ष द्यावें.
----


आपटणाचे तहाप्रों हेहि माहाल आह्माकडे येतील. कदाचित् भीड पडलीच तर थोडीबहुत रदबदली आह्मांस ऐकावी लागेल. परंतु आमची मर्जी नर्मदातीरी बहुत. यास्तव हसोट अंकलेश्वर हे तरी घेणें प्राप्त आहे. जंबूसर मातबर, सबब द्यावें लागेल. कदाचित आमोद मात्र आपले रजावंदीनें त्याजकडे ठेऊं. उर्पाड तीही लक्षांचे, आमोद लक्षाचे बेरजेचे अजमासें लि।। आहे. येविसीची तोडजोड कसें बोलावें, त्याचा विचार आपले जागाच दोन दिवस करून, गणदोष मनन करून बोलणें. हा कागद अद्यापि येथें कोणासही जाहीर नाहीं तेथेंही जाहीर नच व्हावा. मेस्तर शाहा पुर्ता ममतेंत असल्यास, त्यास विचार पुसावा. बापू सारस्वत योग्य असीलियास बोलणें. नाहीं तरी जनरालासीच एकांतीं बोलणें. परंतु त्यासहि लोभ असेलच. तेव्हां बोलणें सख्तच पडेल. लोभापुढें वाजवी गैरवाजवी समजत नाहीं. त्याजपासूनच आह्मास काम घेणें. तरी त्याचाच लोभ तोडावा हें त्यास कसें गोड वाटेल ? यास्तव प्रसंग पाहोन बोलावें. परंतु केवळ पोकळ सोडूं नयें. आपटणानेंच त्याचा लोभ तोडला आहे. जर ते आह्मांस दौलतीवर बसवितील तर आह्मीं लिहून दिल्हें आहे, त्यापैकीं एक गांव माघारा घेत नाहीं. व आणिकही मर्जीस आल्यास थोडें बहुत देऊं. परंतु त्याचे कराराप्रों त्याच्यानें सेवटास न जाई, तेव्हां आमचा करार कोठें राहिला ? जवाहीर व पा। माघारें देणें त्यास वाजवीचे रुईनें प्राप्त आहे. वाजवी विचारतील तरी देतीलच. परंतु या कालांत वाजवी ह्मणजे जुलू ह्मणतात. तपशीलवार लिहिलें आहे. उत्तर तपशीलवार लिहिणें आणि बापू सारस्वत हजूर पाठवणें. कलम १

दरमहांत दिल्हे.

१    हसोट
१    आंकलेश्वरचे बाकी
१    बलसाड
१    भूतसर
----


सदरहू च्यार परगण्यांत आमचे केमावीसदार वाजबी असावे. त्यांणीं सालगुदस्ता जबरदस्तीनें ठेविले ते पा। सांप्रत आह्मांकडे देवावे. हसोटची सनद कारनेलींनीं लटकें बोलून दगाबाजीनें नेली आहे, ती सनद माघारी द्यावी. विश्वनाथ दुभाषा व नारो गोपाळ व भालेराव त्रिवर्ग मध्यें होते. विश्वनाथ, नारो गोपाळ याचे हवालींच केली होती कीं, फत्तेसिंगानें चाकरीस बराबर यावें. गोविंदराव याची तिजाई सरकारांत हवाली करावी व तिजाइेचे रुपये सोळा लक्ष साहासष्ट हजार द्यावे. तीनही कामें करावीं. ६०० दिल्ह्यावर हे सनद कारनेलीजवळ द्यावी. ऐसी बाशर्तीची दिल्ही असतां, विश्वनाथ व नारो गोपाळ यांणीं खुशामतीस्तव दिल्ही. ती कारनेलीनें मुंबईस पाठविली. यास्तव विश्वनाथ तेथें गेला आहे. त्यास पुसणें, रुबरु बोलवणें, आणि सनद माघारीं घेणें. आह्मास पा। घ्यावे लागतील यास्तव तेथेंच येव्हांच बोलावें. कलम १.

पा। व जवाहिराचे विषई मग बोलल्यास कसें ठीक पडेल ? हसोटचे वगैरे जाबसाल वाजवीचे येव्हांच बोलत जावें. ऐसें सुचलें तें लिहिलें असें. तुह्मीं तेथें प्रसंग पाहून बोलणें. केवळ येथील लिहिल्यावर च न जाणें. तुह्मीं येक्त्यारी, इतबारी, प्रामाणिक, शाहाणे ऐसे समजोन तुह्मांस पाठविलें. तुह्मावर जनरालाही कृपा करितात. व जनरालाही प्रामाणिक. यास्तव बोलावें. गैरवाजवीं बोलूं लागल्यास मग बोलूं नये. जसा प्रसंग देखावा तसें बोलावें. कलम १.

बापू सारस्वतास पाठवणें. कांहीं काम आहे. फिरोन पाहिजे तरी पाठवूं. कलम १.

येणेंप्रों कलमें लिहिलीं आहेत. उत्तरें पाठवणें. जाणिजे. छ ५ रोवल.

(लेखनावधि:)