Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १५७.
१६९८ वैशाख शुद्ध ८.
श्रीसांब : सुपुत्रो विजयते.
राजा शाहूनरपति हर्षनीधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.
आज्ञापत्र राजश्री पंत प्रधान ता। रामजी कडूसकर सु।। सीत सबैन मया व अलफ. तुह्मीं पेशजी किल्ले घेतले आहेत. हालीहि जेथवर तुमचा हात पोहोंचेल तेथपर्यंत किल्ले हस्तगत करणें. किल्ल्याच्या बंदोबस्ताकरितां र्व फितुरी याजकडील मिलाफी कुल आहेत तीं हस्तगत करून, च्यार रुपये घ्यावयाकरितां राजश्री लक्ष्मण आपाजी तुम्हास लिहितील त्याप्रों करणें.
जाणिजे. छ ७ रबिलावल. आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
--------------------------------------------------------------------------
श्री.
१६९८ वैशाख शुद्ध १०.
पुरवणी राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यासी :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. अपटणाचे तहाचें पत्र बंगाल्यास पावोन त्याचा जाब येई तोपर्यंत मुंबईवाले लडाई करतील असा रंग दिसत नाहीं. परंतु केली गोष्ट आपली सिद्ध होत्ये, ह्मणोन हर्षित आहेत. बारभाईचे दोष: इंग्रेजी च्यार जहाजें धरून नेलीं व वाट अद्यापि सुरळित चालत नाहीं व भडोचेजवळ तीन लक्षाचा मुलूक देऊं केला तो अद्याप नेमून देत नाहीं. ऐवज मसलतीस खर्च जाहला त्याचे ठिकाण नाहीं व हंगामा मिटावा सबब तह केला तो हंगामा मिटत नाहीं, अधिकच होतो. कोपरगांचा तह बंदीखान्यादाखल. त्यास श्रीमंत राजी नाहींत. सखारामपंत व नाना फडणीस या दोघांनीं मात्र तह केला. परंतु शिंदे, होळकर, भोंसले वगैरे सरदार व मोरोबा वगैरे मुछदी राजी नाहींत. सदोबाचें बंड उभें राहिलें आहे. असा चहूंकडून हंगामा भारी दिसतो. त्यास, श्रीमंतास पुण्यास राज्यावर बसविल्यास राज्याच्या आळा बसोन राज्य चालेल. हंगामा दूर होईल. याप्रमाणें बंगालेवाल्यास पत्रें तयार होत आहेत ह्मणून लिहिलें तें कळलें. उत्तम आहे. मसलतीचा भार त्यांजवरी, तेव्हां त्यांचीं साधनें त्यांस सुचतील तीं करावीं, हें उचित असे.
पंधरा दिवसांत बंगालेवाले याचें कृत्य काय आहे तें कळेल. जर कुमक करून पुण्यास न्यावयाचा करार केला आहे त्याप्रमाणें केल्यास उत्तम जाहलें. कदाचित अपटणानें तह केला हाच खरा ह्मटल्यास तूर्त अमदाबाद हातास आली म्हणजे मोठा आश्रा आहे. अमदाबादेस राहिल्यानें पुढें मसलत होईल ह्मणोन लिहिलें. सारे मसलतीचे अर्थ तुह्मी लिहितां तें खरे व येथेंहि सुचतात. परंतु एक ऐवजाची तोड पडत नाहीं. त्यामुळें कांहींच घडत नाहीं. पोटास तों पाहिजे. कलम १.
अमदाबाद हस्तगत होईल. परंतु अमीनखानाचे हातास आल्यास ते आप्पाजी गणेशास बरे म्हणवितील. त्यास, श्रीमंत रायास समागमें फौज देऊन, लांब लांब मजली करून अमीनखान व आपण एक होऊन अमदाबाद हस्तगत करावी. ही गोष्ट केल्यास घडेल म्हणोन लिहिले तें कळलें. परंतु फौजेचे जाणें ऐवजाखेरीज कसें होतें? सारे अर्थ चित्तांत आणून एक विलग, त्यामुळें राहिलें. कलम १.
इंग्रेजानें मसलत धरिली. हा मजकूर गोविंदराव गायकवाड यास लिहावां व त्याजकडे कोणी पाठवावा म्हणून लिहिलें. त्यास, तुमच्या लिहिल्याच्या पूर्वीच पत्रें व कारकून पाठविला आहे. कलम १.
कदाचित खासा स्वारीचें जाणें अमदाबादेकडे होतें तरी शहर हस्तगत लवकरच होतें. परंतु खासा स्वारी गेल्यास दोष फार म्हणून लिहिलें. त्यास, खरेंच आहे शहर सोडून गेलियानें पाठीवरी फितुरी येतील. कलम १.
इंग्रेजाच्या ह्मणण्यांत या उपरी अपटणानें तह केला तोच बंगालेवाले मंजुर करणार नाहींत. कैदेचा तह बंगालेवाल्याच्या मनास येणार नाहीं. पुण्यास न्यावयाचें पत्र पाठविलें आहे त्याची शरम त्यास येईल, म्हणून लिहिलें तें कळलें. कलम १.
गायकवाडाकडील ऐवज करनेलीकडून आला व येणें. त्याची पावती दिल्ही, त्याची नकल पेशजी पाठविली व हालींही नकल पाठविली असें पाहोन समजणें. त्यांतच त्याजकडोन ऐवज येणें तो पावतींतच समजावा. कलम १. जनराल गार्डन यास तुमचे लिहिल्याप्रमाणें पत्र पाठविलें आहे. कलम १.
एकूण कलमें सात. जाणिजे. छ ९ रबिलावल.
(लेखनावधि:)