Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १५६.
१६९८ वैशाख शुद्ध ८.
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक बाजीराव गोविंद व विठ्ठल विश्राम कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना ता। छ ७ रबिलावल मु।। बेंकापूर स्वामीचे कृपेंकरून सुखरूप असों. विशेष. इकडून पत्रें, तुंगभद्रा दक्षणतीरींहून येक व उत्तरगिरीच्या मुकामांहून दोन वमुक्काम मजकुरींहून येक, येकूण चार जोड्या समागमें विनंतिपत्रें लिहिलीं, त्यांजवरून सविस्तर निवेदन जालेंच असेल. बंकापुरास मोर्चे लाविले ह्मणून लि।। होतें. त्यास बारा तोफा जोडून, मार तोफाचा बहुत करून, किल्ला जेर करून, काल खालीं करून घेतला. येथून कूच होऊन धारवाडास दाखल होऊन, मोर्चे लाऊन, दो रोजांत धारवाड घेऊन, मिरजपर्यंत येत आहों. अैसीयास, खासास्वारी तिकडून कूच होऊन पुढें दरमजल यावें. ह्मणजे इकडून हे फौज व महाराज करवीरकरवासी आपलें सूत्रांत आहेत त्यांची फौज, दाहा हजारपर्येंत आहे, येकत्र होऊन शत्रूचें पारपत्य सहजात होतें. अखेरीचे दिवस आले, याजकरितां जलदीकरून यावें. पुढें मसलत लांबली तरी, हे छावणीकरितां माघारा फिरतील. याजकरिता, विनंति लिहिली आहे. मोठया प्रेत्नेंकरून येवढ्या भारी सरंजामनसी नबाबास घेऊन आलों. आतां तिकडून विलंब जाहला तरी मग काय करावें ? यास्तव स्वामींनीं या समयांत अंगरेज जें मागतील तें कबूल करून समागमें घेऊन पुढें यावें. याणीं ह्मटल्याप्रमाणें अमलात आणिलें. याप्रों तिकडून जोरा व्हावा ह्मणजे कार्यसिद्धि जाहली. येथें तिकडील नाना प्रकारचीं वर्तमानें येतात. याजकरितां तेथील वर्तमान आह्मांस आठवे रोजीं कळे असें कासीद जोड्या चांगल्या निवडून बाध- मुदतीनें पोंहचत असें रा। करावे. म्हणजे वर्तमान परस्परें वरचेवर कळेल. नबाबानीं स्वामीस पत्र लिहिलें आहे तें पाठविलें आहे. स्वामीनींहि पत्र नबाबास बहुत संतोषाचें ल्याहावें. नबाबाचें लक्ष सर्व प्रकारें स्वामीपासीं आहे. स्वामीकडील वरचेवर वर्तमान कळत नाहीं, ह्मणून बहुत श्रमी होतात. याजकरितां वरचेवर पत्रें येत जावीं. स्वामींच्या आज्ञेवरून मुबलक पैका खर्च करून आले. तेव्हां, यासी संतोषाचीं पत्रें आल्यानें, बहुत संतोषीं होऊन कार्यास पडतील. नबाबांसी आह्मी करार-मदार करून दिल्हा आहे. त्याप्रों संनदा स्वामीच्या आल्या पाहिजेत. त्यास, तपसीलवार संनदा यावयाकरितां मार्ग दुर्गट. याजकरितां नवाबाचें नावें येक संनद कीं, बाजीराव याणीं तुह्मासी करारमदार करून दिल्हा आहे त्याप्रों सरकारांतून करार असे. पत्राचें संनद लेहून, आमच्या लखोट्यांत घालून, पाठवावी. याचें कारण आपण म्हणतील तरी येथील बोलण्यांत भाव आहे कीं, मसलतीस पैका तुम्हापासीं द्यावयास नाहीं आणि धणियाच्या सनदा आणून द्याव्या ह्मणून करार केला त्याही येत नाहीं. यांजकरितां लिहिलें असे. हीं पत्रें पावतांच स्वारी पुढें दरमजल यावी. हा योग घडला तर फारच उत्तम. कदाचित् विलंबाचा प्रकार असला तरी, तेथील मसलतीचा विचार कोणे प्रकारेचा तो पुरवणीपत्रीं तपसीलवार लेहून पाठवावा. स्वामीकडे पैका पाठवावा याविसीं नबाबासी बोललों. त्यास, पैकाही सोईसोईनें पाठवितील. सिंदे, होळकर, स्वामीच्या लक्षी आहेत, ह्मणोन येथें वर्तमान ऐकिलें. त्यास त्याजकडीलहि वर्तमान ल्याहावयाची आज्ञा केली पाहिजे. सारांश गोष्ट तिकडून यावयाची त्वरा जाहल्यानें इकडील श्रमाचें सार्थक आहे. याजकरितां विस्तारें विनंति लिहिली आहे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.