Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसांब: सपुत्रो विजयते.
लेखांक १५५.
१६९८ वैशाख शुद्ध ७.
राजश्री लक्ष्मण आपाजी यांसि :-
सबैन मया व अलफ. अपटणानें तह केला तो केवळ अयोग्य. अह्मांस परिच्छिन्न अमान्य. तेव्हां लढाईच सुरू राहिली. बारभाई सोनगडपावेतों आले. आह्मीं सुरतेचे पूर्वेस अश्विनीकुमाराजवळ असों. आंग्रेज माघारे आले ते गांवांत (शहरां) राहिले. कदाचित लढाईच परडली तरी इंग्रेजाची कुमक येईल, हा भरवसा नाहीं. बहुधा येणारच नाहीं. त्यांत करनेल नित्य रुष्ट, याजमुळें अगदींच भरवसा नाहीं. तोंडानें देखील गोड बोलत नाहीं. असो ! जे मसलत प्राप्त होईल तसें करूं. तुह्मी येविसीं जनराल-कोशलास सांगोन आमची कुमक करीत, असा हुकूम पाठवावा. आह्मी त्यांजवर चढोन जात नाहीं. तेच चढोन आले तरी मात्र कुमक करीत, इतकाच पुरे. त्याचा हुकुम आला ह्मणजे झक मारीत येतील. असो ! तुह्मी पुसाल. होईल तरी कराल. न ऐकत तरी उपाय काय ? शहरांत जावें तरी फौज उठोन जाईल. मग, बंगालियाचा हुकूम आला तरी केवळ आंगरेजाच्यांनींच काय होणार ? यास्तव बाहेर राहिला. जाणिजे छ. ६ रबिलावल, बृहस्पतिवार.
(लेखनावधि:)