Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १६०.
१६९८ ज्येष्ठ शुद्ध १४.
नकल पत्राची.
जनराल यास पत्र कीं :-
अलीकडे आपणाकडून खत येऊन खुषीची खबर मालू होत नाहीं. तरी ऐसें न करावें. हरवख्त आपली खुषी कलमीं करून दिलशानगी करीत जावें. दरींविला विलायतेहून बादशाहाचा व कंपनीचा अपटाणांस हुकूम आला कीं इंज्यानेबाची कुमक केली, साष्टीचा किल्ला घेतला, हे गोष्ट मोठी चांगली जाहांली. याप्रों विलायतेहून हुकूम आपल्यास आल्याचें वर्तमान आह्मीं येथें परस्परें ऐकिलें. परंतु हे खुषीची खबर आपण आह्मांस लेहून इतल्ला दिल्हा नाहीं. त्याजवरून ताजूब वाटलें. कारनेल अपटण याणीं तह करून कलकत्त्यास सर जनराल यांस लेहून पाठविलें आहे. त्यास गैरवाजवी तह केल्यामुळें सर जनरालहि या गोष्टीच्या अंदेशांत पडलेच असतील. सांप्रत मुख्य गोष्ट कीं, आपल्यास विलायतेचें लिहिलें आलें असेल मया अर्थें या गोष्टी दिरंगावर न घालाव्या.
त्सल मारून बाजू शेर करावी. आपले अभिमानाची शौरत दुनियेंत महसूर होय तो अर्थ घडवावा. येथील खर्चाचा मोठा गलाठा आहे, येविसीं लक्ष्मण आप्पाजी यास लिहिलें आहे असे. जाहीर करितील. त्याप्रों अमलांत आणावें. छ १३ रबिलाखर.