Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीशंकर.

लेखांक १५३.


१६९८ चैत्र वद्य १४.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. खासा स्वारी सुरतेस येऊन राहिली. लोकांचे शिबंदीचा गवगवा. मसलत सर्व प्रकारें बिघडली. सर्व संकटप्राप्त्या एक इंग्रजांचे प्रतिकूलतेमुळें जाली. परंतु याचे घरीं असरियास येऊन राहिल्यानीं दुसरियाचा उपद्रव लागों देणार नाहीं व राहूं तोंपर्यंत जा ह्मणणार नाहीं, ऐसी खातरजमा पक्की होती. यामुळें वीस बेवीस रोज येथें गुजरले. वरचेवर तुह्मांस व जनरालांस पत्रें लिहीत गेलों. अपटणशंसहि दोन पत्रें लिहिलीं. कांहीं तरी सोय निघेल. जनरालांनीं अंग्रेज केला आहे. त्याची काळजी त्यांसच असावी. आजपर्यंत ज्याचा हात इंग्रजांनी धरिला तो सोडला नाहीं. ऐसा यांचा लौकिक ऐकत आलों ऐसें असतां, सांप्रत आह्मांस पटकी बसविली. केवळ विश्वासघात, मोठे दगाबाजहि बेइमानी होत गेले, त्यांच्यानेंहि कोणाचा जाला नसेल ऐसा, जाला आहे. त्यांचें विस्तर कोठवर ल्याहावें ! असो ! एथें दम खाऊन शिबंदीचा गवगवा वारावा, लोकांचे हातून मुक्त व्हावें, तोडजोड पडेल तैसी पाडावी, दुसरे कोठें गेलियास परिणाम नाहीं, ऐसें जाणून लाचारीस आजपर्यंत मुक्काम करून राहिलों. मुंबईस यावें अथवा भडोच सुरत येथें राहावें, तरी शिबंदीनें प्राणाशीं गांठ घातली आहे. यांचे हातून उलगडा जाला म्हणजे मग जो विचार करणें तो करावा. ऐसें असतां, काल छ २७ सफरीं मेस्र गंभीर कारनेल किटीण यांनीं येऊन साफच सांगितलें कीं, इतके दिवस तुह्मी येथें राहिलां, त्यास शहरा-आसपास तसदी फौजेची लागती, फडके वगैरे फौजा तुह्मांवर येणार, आह्मांस कुमक होणार नाहीं, व फौजसुद्धां तुह्मांस ठेऊन घेतलें, याची बदलामीहि आह्मांवर येईल, यास्तव कूच करून जावें, हरकोठें दम खाऊन फौज जगवावी, बचाव जे रीतीनें होईल तैसा करावा, आमचें भरवसियांवर राहूं नये. शहरांत येत असाल तरी दोनशें माणसांनसीं यावें, महमुदीबागांत शहरांत जागा करून देऊं, जाजती लोक आंत घेणार नाहीं. ऐसें तुटकेंच बोलिलें. इतके दिवस मसलतीची उमेदच दाखवीत गेले. टेलरचें पत्र आलें, यांत कांहीं बरें असेल असें ह्मणत होते. त्याचा जाबसाल परस्पर त्यांस जनरालाचा आला व तुह्मींही त्याचें बोलणियाचे भाव सुचवून लिहिलें. बंगालवाले जनरालांचे पत्र तरी आह्मांस पावलें नाहीं. परंतु अर्थ ध्यानांत आला. त्याजवरून केवळ संकटाचे दिवस प्राप्त जाले. तेव्हां फिरंगियाचें राजकारण, सुरतेंत त्याची कोठी आहे, त्याचे हातून दवणकरांसीं लागूं केलें. त्याणीं, येऊन राहावें, आमचे पेटयांत आलियास बाहेरील पेंच पडों देणार नाहीं, फौजसुद्धां बचाव करूं, पुढें गोव्याकडील जाबसाल आणून मसलत करणें तैसी होईल. इतका त्याचा आसरा धरून तूर्त प्राण रक्षावयाकरितां तेथें गेलों. परंतु सर्व भार इंग्रजांवर आहे. ज्या तरेनें आमची कुमक होय ते गोष्ट त्याणीं करावीं. त्यांचे घरींहून दुसरे जागा गेलों, ऐसें न समजावें. कालहरण मात्र केलें आहे. हे अर्थ जनरालासी बोलावे. जाणिजे. छ २७ सफर. तूर्त सुरतेंस आहों. कलकटेकरांचें पत्र पाठविलें आहे, त्याचा जाबसाल तुह्मांकडून आला ह्मणजे करणें तैसें केलें जाईल. छ मजकूर.