Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १५१.


१६९८ चैत्र वद्य ६.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. सरकारांत खर्चाची वोढ आहे, ही तुह्मांस समजूनच आहे, याविसीं जनरालासी बोलोन कांहीं तोड काढावी, म्हणून तुह्मांस वारंवार लिहिलेंच आहे व तुम्हीहि बोलतच असाल अपटणानें तह केला, त्यांत तीन लक्ष सालिना खर्चास देऊन कोपरगांवीं राहावें ऐसें ठरविलें. त्यास, कोपरगांवीं रहाणें कसें घडतें हा मजकूर विस्तारें पेशजी ऐक दोन पत्रीं लिहिला. कोपिनीच्या स्थलांत राहूं. येथें सदरहू ऐवज जनरालांनीं अपटणास लिहून फितुरि याजकडून आपण घेऊन आमचा खर्च चालवावा. ह्मणून एक दोन पत्रीं लिहिलें होतें. त्याजवरून जनरालाजवळ बोललां. त्यांणीं आपटणास लिहिलें. त्याचा जाब जनरालास आला कीं, कोपीनीच्या स्थलांत राहून खर्चास द्यावयास अनकूल पडणार नाहीं. याप्रों त्याचा जाब आला, ह्मणून जनरालानीं सांगितलें, ह्मणून लिहिलेंच. त्यास, याविसीं पेशजी तुह्मास लिहिलें असेल, त्यावरून तुह्मीं जनरालासी बोललां. परंतु आम्हासहि फितुरि याजकडून खर्चास घेऊन राहावें, हें योग्य नाहीं. खर्च चाला पाहिजे, हें संकट जनरालास. परंतु पदरचा खर्च करून चालववों हि हिंमत न होय. तरी आमचेच ऐवज दोन-तीन आहेत ते दाखवावे. एक, सा लक्षाचें जवाहीर गाहाण आहे तें आपटणानें फितुरियांस द्यावें, ह्मणोन ठराविलें आहे. अपटण आमचे जवाहीर कोण देणार ? जनरालानीं अपटणास साफ ल्याहावें, ज्याणें आह्मापाशीं जवाहीर दिलें त्याचें त्याजवल आह्मीं देऊं, दुसऱ्यास देणार नाहीं, तुह्मी काय समजोन फितुरियास द्यावें ह्मणून ठरावितां, आम्हास दुसरेयास देतां नये, ज्याचें त्यास देऊं म्हणून आपटणास जनरालानीं ल्याहावें आणि आमचें जवाहीर आम्हांस द्यावें. म्हणजे सा लक्षाचे जवाहीर हरयेक जागा ठेवून, निदानीं तीन लक्ष रुपये मिळतील. हा येक ऐवज. दुसरा: कारनेल किटिंग यांणीं फत्तेसिंगाबाबत दहा लक्ष रुपये वसूल करून घेतले. त्यापैं॥ सरकारांत सा सवा सा लक्ष अजमासें दिल्हे आणि पावती दहाची घेतली. त्यापो बक्षीस लक्ष सवा लक्ष जाऊन बाकी वाजवी दोन अडीच लक्ष पावेतों निघतात. याचा तपसील तुम्हांस लिहिलाच आहे. हा ऐवज जनरालांनीं वाजवी आह्मांस देववावा. व मोगल सुरतकर याजकडे चौथाईचा ऐवज येणें. त्यास सालमजकुरीं पैसा आला नाहीं. मोगलाकडे चाळीस पन्नास हजार रुपये येणें. तो सुदामत देत नाहीं. त्यास गंभीरास जनरालांनीं ताकीद करून, सदरहु ऐवज देवावा. हे तीन ऐवज आमचे आह्मांस देवावे. पदरचें देणें यांत लाभत नाहीं. याप्रो जनरालाजवळ बोलोन, जवाहीर वगैरे लिहिल्याप्रों मागोन घ्यावें. आपटणाचें पत्र सरकारांत आलें. त्याचा जाब त्यास लिहिला आहे. तो त्यास जनारलाकडून पावता करावा. त्याच्या मसुद्याची नकल पाठविली आहे. तात्पर्य, बहुत नरम लिहिलें आहे. याचें कारण आमची कुमक इंग्रेजांनीं सोडिली व त्यांजवळून मोंगल तहवरजंग गेला तो आमच्याच सूत्रानें गेला. पुढें दो ती महिन्यांनीं आम्हास उपयोगी पडेल. हालीं उभयतां आंगजोरच आहों. त्यांत फितुरयाची फौज फार सडली. महागाई. वैरण मिळत नाहीं. घोडीं माणसें उपासी मरतात. लोकांस रोजमरा सा सात महिने नाहीं. सबब फौज उटोन जात आहे. तीजमध्यें कुवत नाहीं. याप्रमाणें तिकडील हैराणगत तूर्त आहे. पुढें जमतील. हालीं त्यांची आपली बरोबरी आहे. सबब लढावयाचा विचार ठराविला आहे. सरकारचे फौजेचा लडावयाचा दम भारी आहे. व येथें सुरतेस सरंजाम पाहिजे तो मिळतो. दारूगोळा, सिसें व सिबंदी गाडद मिळते. लोकांतही दम मोठा. यास्तव लडाईची तर्तूद करीत आहों. या दिवसांत गाठल्यास मनसबा ठीक पडतो. पुढें ते भारी होतील. सबब आह्मींहि बलकटीच आंतून करितों. त्यांस न समजावें, समजल्यास सावध होतील. यास्तव नरम जाब आपटण यास लिहिला आहे. लडाई आठ पंधरा दिवसांत व्हावी, ऐसें आहे. गोविंदराव वगैरे बोलाविले आहेत. तेहि इतक्यांत येतील. लडावयाचा केवल निश्चय नाहीं. बनल्यासारिखें होईल. तुह्मी सुरत, मुंबई, भडोच या तीनही स्थलांतून हरयेक मर्जीस पडेल तेथेंच राहूं. तेथें खर्च चालला पाहिजे. तो जनराल देतीलच. परंतु जनरालावरही संकट न पडतां आपला ऐवज त्याणीं उगऊन दिल्यास त्याचे हातीं आहे. येणेंकरून त्यास संकट नाहीं, व आमचो काम समजोन प्रसंगानुरूप बोलणें. जाणिजे. छ २० सफर.

(लेखनावधि:)