Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक १४.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पु।। श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामीचे सेवेसी :-
विनंति की : पूर्वी सरकारासी इंग्रजांनी इनामप्रमाण देऊन किल्ले व प्रांत त्यांणी घेतला आहे तो सोडवणे मान्य केलें. व दोघे गोरे सरदार बोलीस देऊन बदरका स्वामीपासोन घुसून सुरतेस गेले व तेथें जाऊन करणेल गाडर इकडून गेला त्याचे विचारे फिरोन बेमानी केली. त्यावेळेस सोडिले यास्तव व त्यांचे बेमानीस्तव आजवर झुंज लांबले. तेच समई मारून ताराज केले असते तरी जेरबंदी होती. यादिवसांत नजबखान पुसत होता की, पूर्वी श्रीमंतांचा त्यांचा कौल-करार कसला ठरला ? त्याचें उत्तर आह्मी दिधले की, त्याणी इमान सोडल्याचा तपसील काय, त्यांचे दोघे गोरे सरदार आजपावेतों वोलीस आहेत, इतके श्रवणांत आलें आहे. वरकड तपशील श्रीमंतांस लेहून पाठवायास आपले मर्जीप्रो लिहितो. इतके बोलोन सेवकानें यांजला सांगितले कीं, त्याची भानगड आपण करावया योग्य ते नाहींत. तेव्हां बोलिले कीं, त्यांजला शरमिंदे करा. वयास्तव व बेमानी त्यांची त्यांचे अंगी लागावयास्तव तुह्मांस वर्तान पुसिलें, तें तुह्मी लेहून उत्तर आणावे.सलाह यास मारण्याची आहे, फौजेचे जोरानेंही मारावें व याजपासून सो घेऊनही यास मारणे प्राप्त, हस्तगत करावा, तपसील कसकसा करार- मदाराचा जाहला तो जरूर लेहून आणवणें की, असफद्दौला त्याचे इमानप्रमाणावर सर्वस्व गेले असतां गाफील आहेत त्यांस फोडून आपले करून घेऊं, व पठाण रोहिले सिद्धच आहेत. याप्रो। बोलोन सेवेसी ल्याहावयास सांगितलें. त्याप्रो।। लि।। असें. उत्तरीं तपसील लिहिणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पो. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.