Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक १२.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचें सेवेसीं :-
विनंति ऐसीजे : पातशहा व नजबखान दिल्लीत आहेत. याजकडील सरदार मिरजा सफीखा नामें कुंजपुऱ्याकडे पाठविले होते. त्यांणी गणपतसिंग जाटाचा मामला सहा लक्षांचा करून त्याप्रोाा तीन लक्ष रुाा वसूल घेऊन, त्याचे पुत्रास वोलीस ठेवून, त्यास वस्त्रें देऊन मार्गस्थ केले. तीन लक्ष रुाा राहिले ते किस्तीप्रों. येथील कलकत्याकडील बातमी आली कीं, मिस्तर इष्टीन यांस कांही नक होऊन वेडा जाला. +++++++++++ याप्रों लेखन लिहून वर्तमान आलें कीं, इंग्रजांनी वजिरास सांगितले जे आमच्याने तुचा मुलूक राखवत नाहीं. तुह्मीं आपली फौज ठेवून मुलुकाचें संरक्षण करणें. त्याणीं उत्तर दिल्हें की, आमची फौज होती ते तुह्मी खराब केली, आता आह्मी नवी फौज ठेवावी तरी आह्मांपासी पैका नाहीं. याप्रों उत्तर देऊन, स्वार होऊन, सिकारीस गेले व कारभारी यास आज्ञा केली कीं, फौज मिळेल ते ठेवणें. याप्रों वजिराकडील वृत्त आले ते श्रुत व्हावयास लिाा असे. इंग्रजाकडील जहाज कलकत्यास इष्टीनचे बदलीचा सरदार येत होता ते जहाज आंग्रे यांणी मारिले बुडविले, हे वृत्त कलकत्तेकराने श्रवण करून संतोषी जालें. पुढे येईल ते विनंति लिहू. दर्शनलाभ होय तो सुदिन. कृपा केली पाहिजे. हे विनंति.