Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

आपली हलकीचें वारंवार वर्तमान रड लिहितात. सेवकाचे लक्ष तों च्यरणापासीं, की कोणेही प्रकारे उलगडून यावें. आमचे भर-वाता ईश्वरस्थानीं आपण. इहलोकी संवसार सर्व आज वीस वर्षे सेवकाचा स्वामिच्यरणाचे आधारावर. स्वामींनी कृपा करून शरीर संरक्षण व आबरू संवरक्षण केलें व करितात. दैवदशा बलवत्तर आहे ! इत:पर मासपक्षांत सर्व कुटुंबसुद्धा देशास यावें, चिरंजीव आठा नवा वर्षाचा आहे, त्यास स्वामीचे शागीर्दीस म्हणून हातीं घ्यावें, च्यार कामें अस्तील त्याचा मार्ग स्वामीचे मर्जीस येईल तैसा करतील, जमल्यास श्रीइच्छा म्हणून स्वामीची आज्ञा घेऊन एकाकी श्री कासीवास अथवा तीर्थवास करून जन्म सफल करावा, हाच निजध्यास. एविषई विनंति समक्ष केलीच आहे. येणेंकरून ...... यथास्थित स्वामिच्यरणाचें कृपने जालासा होईल. हा निजध्यास अहिर्निशी लागला आहे. येथील उलगडा पाडावा; परंतु स्वामीचे कृपेने सांप्रत कांही सोईस आला आहे. मासपक्षांत निकाल पाडून, स्वार होऊन, यांची स्वारी जलदीने आल्यास याजसमागमेंच येतो. कदाचित् दिवसगती खाले असल्यास विनंति लिहिल्याप्रमाणें येथील गुंता उरकून येतों. साकल्य च्यरणदर्शनाअंती निवेदन करीन. पत्रीं लिहिता विस्तार आहे. तीर्थस्वरूप राजश्री पुरुषोत्तम पंतनानाकडील पत्रे व मुजरद कासद आला, त्याची रवानगी उदैक सेवेसी करितो, त्याजवरून साकल्य कळेल. त्यांचे संवरक्षण व आमचे करणार स्वामी समर्थ आहेत. इत:पर सत्वर येतों. येथें एक एक घटका युगवत् जाते त्याचा विस्तार काय लि॥? विशेष काय लिहिणे? कृपा केली पाहिजे. हे विनंति. वेदमूर्त राजश्री गोविंदभट तात्या स्वामीस सा। नमस्कार विनंति. लिखितार्थ परिसोन कृपा करावी. येथून उलगडून निघावें व पत्राचे उत्तर पाठवावे, यास्तव उत्तर न लिहिलें. परंतु ग्रहदशा बलवंत. तरी आणखी मासपक्षाचा अवकाश पाहून उत्तर लिहिलें. अहिर्णीसीं निजध्यास हाच आहे. हें अगर सत्वर कोणेही प्रकारे येतो. कळावे लोभ कीजे. हे विनंति.