Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक १८.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, इंग्रजांचा सहवास नजबखानास बहुत. पादशाहींत त्यांचा कदम व सीरावा हें आहेच. श्रीमंत राव पंतप्रधान हजूरचे फिदवीयाची फते असावी हेंच रात्रंदिवस चित्तांत आहेच; यांत संवषय नाहीं. टोपीकराचे वकिलास रुकसत दिल्ही, हे फार नेक सलाह केली. तुह्मीं लिहिल्यावरून मूळीची व हजूरची इनायक याजवरून इकडील खातरजमा आहेच. सरकारचे सरदार आजपों। पोंहचले असते. गुंता नव्हता. परंतु दरम्यान इंग्रजी पलटणें आलीं, तो शह पडला, ह्मणून दिक्कत पडली. याची तर्तूद अलाहिदा लिहिली, त्याप्रमाणें अमलांत यावें. ह्मणजे सर्व गोष्टींत उभयपक्षीं खातरजमा होवून, योजितली मसलत सिद्ध झाली. गाडर कोंकणातून घाट चढून आला होता, त्यास सरकारचे सरदारांनीं शिकस्त दिल्ही. त्याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे. त्यावरून कळेल. ह्मणून लि।। त्यास आज्ञेप्रमाणें हा मार सविस्तर नजबखानास समजावून प्रसंग पाहून, संतोषातें पावले. तेव्हां बहुतेक ममतेनें पूर्वी वचनें दिधलीं आहेत. तीं दुहराहून बोलोन त्याणीं उत्तर दिलें कीं, श्रीकृपेनें बादजबरसात काय घडून येतें तें प्रत्ययास येईल. इंग्रजांची व आमची बरोबरीची लढाई आहे, त्यास आमचा तोफखाना व पलटणें सन्मुख व तुह्मांकडील फौज करोलीस उपराल्यास असलिया सहा महिन्यांचें काम आठ दिवसांत फडशा करूं, इंग्रज काय वस्तु आहेत ? याप्रमाणें बोलून आपल्यास व श्रीमंत स्वामीस खलिता पत्रें दिल्हीं. त्याजवरून ध्यानारूढ होईल. पुढें अमलांत येईल ते मागाहून विनंति लिहू. कृपा केली पाहिजे. हे विनंति.