Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक ११.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी:-
पो। पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता।छ ५ माहे जमादिलाखर मु।। दिल्ली जाणून स्वानंद लिहिला पाहिजे. विशेष. छ १५ रा।वलची पत्रें सरकारचे जोडीसमागमें पाठविली ते छ ५ माहे मजकुरी पावली. त्यास इकडील वर्तमान पैदरपै विनंतिपत्रें हुजूर पाठविली ते पावून वृत्त श्रुत जालेंच असेल. हाली वर्तमान तरी: पातशाहा व नजबखान दिल्लीतच आहेत. व राजश्री महादजी शिंदे शिपरीकोलारसेस आहेत. इंग्रजांचे व यांचे लष्करांत महागाई आहे. पाटिलबावापाशीं कडील रांगडी व देशची भारी फौज आहे. पुढें होईल ते विनंति लिहूं. वरकड वृत्त पुरवणीपत्रावरून श्रुत होईल. नबाब नजबखान यांनी स्वामीस पत्र लिहिले आहे व पातशाचा शुका सो पाठविला आहे त्यावरून वृत्त कळेल. उत्तरीं कृपा करून लिहावयास आज्ञा करावी कीं, लिहिलेप्रमाणें सत्वर अंमलात आणावें. ह्मणजे लिहिल्याचें व सेवकाकडून वारंवार फौजेचा बोझ लिहिल्याचें सार्थक होईल. विशेष मर्जीस येईल ते ल्याहावें. सेवाश्रम केलियाचे सार्थक होईल तो ईश्वरकृपेनें सुदिन. विलायती आनारें या दिवसांत तेथवर गर्मीमुळें न पावतील, यास्तव रस काढून रुबा करून पा॥ आहे. हे विनंति.