Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १७.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेशी :-
विनंति सेवक पुरुषोत्तम महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत छ ५ जमादिलाखर मुक्काम दिल्ली स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असो. विशेष. कृपा करून छ १५ रबिलावलचें पत्र पाठविलें तें छ ५ माहे जमादलावली सरकारचे कासिदा-समागमें पावलें. पत्रीं आज्ञा कीं, तुह्मीं पातशहासी व नबाब नजबखानासी बोलून इंग्रजांचे तंबीचा आहद-पैमाना घेऊन पाठवणें, वरकड सविस्तर राजश्री बाळाजी जनार्दन यांनीं लिहिलें आहे त्यावरून कळेल ह्मणून आज्ञा. त्यास आज्ञेप्रमाणें याजपासून आहद-पैमान सरकारचे नांवें लिहून घेतला आहे. त्याप्रमाणें राजश्री महादजी शिंदे यांचे नांवें मागतों. पाटीलबावा यांनीं ग्वाल्हेर प्रांतीं इंग्रजांची लढाई मारली ह्मणजे याजवर दाब बसून पूर्वी कौलनामा लेहून दिधला आहे त्याप्रमाणेंच वर्तणूक करतील व सरकारचे सरदाराचे सामीलही होतील. वरकड सविस्तर राजश्री बाळाजी जनार्दन यांचे पत्रीं लिहिलें आहे त्यावरून श्रुत होईल. सदैव कृपा करून हस्ताक्षर- पत्रामृतीं सनाथ करणार. स्वामी समर्थ आहेत, दर्शनलाभ होय तो सुदिन. कृपा केली पाहिजे. हे वि.
पौ। छ १६ रजब सन
समानीन बाा सरकारची जोडी.