Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक १६.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध १०.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति आमचें वर्तमान तर :- ज्येष्ठ शु॥ १० दशमींस यमुनास्नानास निंगबोधास गेलों होतों. त्यास, यमुनातीरीं, लतापत-अल्ली-खान ह्मणून खोजा वजीराकडील चों पलटणांनिसी पातशहाचे तैनातीस आहे त्यास, परस्परें कजिया माणसामाणसी जाला. त्याजकडील जमाव भारी. दोन माणसें मारली गेलीं. आह्माकडील एक खितमतगार मारला गेला व प्यादा एक जखमी जाला व हत्तीस सात जखमा जाल्या व आह्मास च्यार जखमा जाल्या. भुंवईवर एक व हातावर एक व पोटावर एक व पाठीवर एक, ऐशा चार जखमा जाल्या त्यांत पोटावरील जखम भारी होती. परंतु आपले प्रतापें व पुण्येंकडून वांचलों. जखमा बऱ्या जाल्या. एक महिना मानसिक स्नान जालें. आतां स्नान करीत असतों. तात्पर्य, आज आठ दहा वर्षें जालीं, सरकारची फौज इकडे आली नाहीं आणि नजबखान बळावला. याजकरितां व इंग्रजी पलटणें पुण्यासमीप आलीं त्यांचे पारपत्य खातरखा न जालें व ग्वालेरीपासीं पलटणें आहेत त्यांचें पारपत्य अद्यापि खातरचा होत नाहीं, हा रंग रांगडे पाहून आपलाले ठिकाणीं बदमस्त जाले आहेत. कोण्हास खातरेस आणीत नाहींत. व आह्मापासीं जमाव तों तैनाती बाळाजी गोविंदाकडील सरकारांतून देविला तो त्यांनीं न दिधला. जुजबी माणसें व दक्षणक्ष कोण कोठें आहेत, हाही मजकूर कोणाचे ध्यानांत राहिला नाहीं. परंतु या काळांत आपले प्रतापेंकडून पूर्वील पारटीवर भ्र व सर्वांसी स्नेह आहे त्यावर जीव आबरू आहे. कपर्दिकेची प्राप्त याजकडून नाहीं इतकेंही असोन सरकारकामास्तव जडाव राखून आपली अब्रू रक्षून स्वामीचे नांवयशाप्रमाणें आजपावेतों श्रीनें रक्षिलें. पुढें पोस्तसर काम होऊन शत्रूचें पारिपत्य सेवकाचे हातें करविणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय. तो सुदिन. हे.वि.