Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीगणराज.

लेखांक १०.

१७०२ कार्तिक शु.॥ १३
पौ छ १९ जिल्काद.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
पोा देवराव माहादेव कृतानेक साां नमस्कार विनंति येथील कुशल ताा छ १२ जिल्काद स्वामीचे कृपेकरून यथास्थित असो. विशेष. कृपा करून पत्र छ १९ रमजानचें पाठविलें तें पावोन परम संतोष जाला. पत्रीं आज्ञा कीं, सरकारचा जाबसाल होणें यास्तव राजश्री पाटीलबावाचा निरोप घेऊन पुण्यात येणें, ह्मणून पेशजी तुह्मांस लिहिले होतें. परंतु त्याचें उत्तर न आले. त्यांस, तुह्मी कोठे आहां ? काय करतां ? वर्तान काय ? ते सविस्तर लिहून पाठवावें, ह्मणून आज्ञा. त्यास, पुण्याहून स्वामीपासून आज्ञा घेऊन जांबगांवी आलों, तेथून राजश्री पाटील बावाची स्वारी गुजराथ प्रांती जावयाची आली, ते साकल्य विनंति लिहिली. त्याची उत्तरे आली. आज्ञा येण्याविसी जालीं. त्यावरून यावें. परंतु पांच वर्षे यांचे संग्रही राहिलों. त्यांणी सरकारचे सनदेप्रमाणें दरमाह व आपले तर्फेने विशेष करून वरात संवस्थान कोटें येथे करून दिधली. त्यास, पांच वर्षे जाली. पैशास ठिकाण नाही. पदरचे सुखीं आह्मी कोणेंप्रकारे व काय अवस्थेनें दिवस काढितों. ते अवस्था स्वामी चरणासी लोपली नाहीं. चार दिवस येथें काळ-हरणार्थ आलों तों येथील नेमणूक दरमाहाचा दरमाहा द्यावीसीं केली. त्यास पांच वर्षे समूळ ठिकाण नाहीं. तेव्हा तेथे लोकांचे देणे पोटामुळें जालें. कुटुंबसहित येथे फसावा जाला. निघणें संकट यास्तव कोंडाईवारीपर्यंत समागमें आलों. वरातीची ताकीद होऊन कार्य होईल. नित्य विनंति केल्यास उत्तर हेंच की, देवितों. ज्यांचे देणें तेंही लस्करांतच त्यांचा आग्रह वरातीस ठिकाण लाऊन आमचा निकाल पाहून जावें. तेव्हां निरोपाय होऊन बारी उतरणे प्राप्त जाली. वरातीचे उत्तर निस्तोष होत नाहीं. हेंही होईना. वर्कड कोणी अनकूल होऊन, ममता धरून, हटकून कार्य करून निकाल पाडून घ्यावा व साहुकाराचे संबंधाने च्यार गोष्टी बोलून करावें, तर अनुकूल होते ते देखील प्रतिकूल जाले. त्याचों कारण जाले ते जांबगावांहून साकल्य विनंति सेवेसीं लिहिलीच होती. निरोपाय होऊन, गुजराथ प्रांत पाहून, संपूर्ण मुलूखगिरी, महर्घता, शरीरास समाधान नाहीं, हे सोसून मधें सोबत पाहून, हरएकही प्रकारें च्यरणापासीं यावेसें योजिलें. परंतु निर्फळ होऊन उज्जनपर्यंत येणें प्राप्त जालें. येथें ये तों दीड दोन महिने शरीरास पीडा प्राप्त प्राणांतिक झाली. स्वामीचे कृपेंकरून उलगडलो. संवस्थान कोटें येथील कमाविसदार येथें आले. नित्य ताकीदीने हटकिता, आज उद्यां करितां, आजपर्यंत झालें. शेवट प्रतिकूळ होते ते अनुकूळ करून घेण्यास, यांची मर्जी कायम करून देण्याविषई जाण्यास प्रयत्न करितां, सांप्रत जाबसाल सोईस येऊन कमाविसदारास ताकीद मागील बाकी देण्याविषई व पुढे चालविण्याविषई जाली आहे. आता कमाविसदाराकडून तजविजेनें साहुकारासी गांठ घालून त्याची खातरजमा करून यावें, हें बाकी आहे, त्या उद्योगास लागलों आहों. स्वामीकडील सिफारस आणून कार्य करून घ्यावे, तर तोही प्रकार येथें उपयोगी पडणार नाहीं. हें जाणून सेवेसी विनंति लिहिली.