Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १४२.
१६९८ चैत्र शुद्ध २.
राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यासि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. धौशाकडील राजकारण आलें आहे. हा मजकूर पहिलाही तुह्मांस लिााच आहे. व हालीहि अलाहिदा पत्री लिाा आहे.कळेल, तात्पर्य, मोगलाचें राजकारण अंगरेजाचे मध्यस्तीखेरीज बनत नाहीं. याविसीं मागें कच्ची खातरजमा अंगरेजाकडून जरूर आली पाा. याचा प्रकार जनरालासी फार समजोन बोलणें. जनरालाकडून कार्य आमचें सेवटास जाईना. आपटणानें गुंता पाडिला ह्मणून मोगल अनुकूल करून घेणें प्राप्त जालें. व मोगल मागेल ते देणें प्राप्त. याचा संशय कदाचित जनरालाचे मनांत येईल कीं, आपले मध्यस्तीनें मोगल अनकूल करून देविल्याने श्रीमंत व मोगल येकत्र होऊन फितुरियाचें पारिपत्य करितील, आपण अभिमान धरिला असतां आपल्याच्यानें काहीं जाले नाहीं, तेव्हां आपल्यास श्रीमंतांनींजें देऊं केलें आहें तें प्राप्त होणारनाहीं,कंपनीचे सरकारचा नफाआपटणांनी फितुरिरयापासोन ठाऊन घेतला असले तोही बुडेल, तेव्हा मोगल अनुकूल श्रीमंतांस करून देणें वाईट. असे चित्तांत आणून मोगलाचे खातरजमेविसी जनराल आमचे अनुकूल होणार नाहीं. अशी उगीच आशंका चित्तांत आली. ह्मणून हा मा।र तुह्मांस कळवयाकरितां लिाा असे. तरी असी आशंका तरी जनरालाचे चित्तांत न ये आणि मोगलाचे राजकारणाचे खातरजमेस जनराल अनुकूल होत, तसे तऱ्हेनें बोलोन धौशाची व निजामअल्लीची खातरजमा अलाहिदा लिाा प्रमाणें करीत तें करणें. तुह्मी शहाणे व आमचे यख्तीयारी आहां. न तुटतां तोडजोड होईल तें करणें. जाणिजें. छ ३० मोहरम. ब्रहस्पतिवार.
(लेखनावधि:)