Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १४०.

१६९७ फाल्गुन अखेर.

राजश्री लक्ष्मण आपाजी यांसि :-
सुहूर-सन सीत सबैन मया व अलफ. अपटणानें तह केला, हा शेवटास जाणार नाहीं. श्रीमंतांचा तह पडल्यासिवाय साऱ्या दौलतीस चैन नाहीं. बारभाई थकले. फौजे द्यावयास रु।। नाहीं. बहुत हैराण जाहाले. यास्तव कांही तह पाडावा, ऐसें, हरि फडके व आपा बळवंत वगैरे फौजेसमीप आहेत, या सरदारांचे मनांत आलें आहे. बातमी खरी आहे. अमदाबाद द्यावी, निदानीं सारी गुजराथ द्यावी, आणि तह पाडावा, ऐसें आंत घाटतात. येविसीं त्यांनी पुणियाकडेही लिहिले असेल. अपटणाचें संमत घेऊन आह्मासी बोलतील, ऐसें तह-कीक बातमींत वर्तमान आलें. त्याजवरून हें आगाव पत्र तुह्मांस लिहिलें असे. गुजरातेवर तह करावा किंवा न करावा ? गुजरातेपैकी दोघे गायकवाडांचा कारभार पुणियास ठेवितील. सरंजाम्यांचे महाल आहेत. त्याविसीहि सलोखा करतील. तेव्हा थोडकेंच राहील. बहुतकरून इंग्रेजांनी निवडक परगणे घेतलेच आहेत. तेव्हां दहा पांच सात कोठें निव्वळ राहतील हें कळत नाहीं. आमचा भाव कीं, इंग्रेजास हुकूम बंगालियाचा अर्धा तरी आलाच आहे, बाकीहि श्रीकृपेनें येईल. विलायतेचाहि येईल. याणीं सारीच दौलत आमची कायम करून द्यावी, ह्मणजे आमचे नफे व इंग्रेजांचेही नफे आहेत. पुढें मोगलाचें पारपत्य करावें. त्यांत चवथाई देऊं. आमचे सरंजामी हरामखोर आहेत. त्यांचे पारिपत्यास अनकूळ असावें. तेथें दहला देऊं. एकूण इंग्रेजाचे बहुतच नफे. आमचे तरी आहेतच, कदाचित तूर्त (पुढे गहाळ).