Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १३७.

१६९७ फाल्गुन वद्य ६.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. अपटणाचें पत्र आलें. त्यांत भाव, गंगातीरीं यावें, ऐसा आहे. त्यास, जनरलाचे विचारास आली तरी नाजूक मसलत आहे. त्यास, पक्केपणें जनरालांची व मुंबईकर सारे इंग्रजाची अनुकूलता मात्र असली पाहिजे. त्याचा कटकणा ऐसा करावा जे, दारमदाराचें बोलणें हें केवळ येक पक्ष समजोन होत नाहीं. तेव्हां अपटण याणीं त्यांचें वर्तमान ऐकिलें, तैसेंच येथें येऊन आमचें ऐकावें. त्यास, पल्ला लांब, याजमुळें दिवसगत लागती. सबब, ऐसीं तोड काढावी कीं, आह्मीं सारें इंग्रजसुद्धां फौजसह कुच करून खानदेशांत श्रीगंगातीरपर्यंत जावें, तेथें अपटण यांनीं तिकडोन यावें, आणि सर्व मजकूर समजावे, उपरांतिक त्याचे आमचे बिचारें होईल तैसें करूं; नाहीं तरी आम्हांस मुंबईस पोंहचवावें. ऐसें असासें. इतकियांत आह्मी इंग्रजसह घाटावर गेलों ह्मणजे देशांतील कितेक सरकारांचीं वगैरे राजकारणें आहेत त्यांचीं साधनें करून मेळऊन घेऊं. फौजहि जमा होईल. मुलूक मारून पोटासहि मिळेल. आमची मजबुदी जाली, ह्मणजे फितुरी सहजांतच पेचांत येतील. इंग्रजांसहि मेहनत पडणार नाहीं. मसलत सिद्धीस जाईल. परंतु या गोष्टीस इंग्रजांची अनुकूलता पक्की पाहिजे. कितेक राजकारणें येतील, त्यांत मातबरांची खातरजमाहि आंतून करावी लागेल. ही येक मसलत आहे. आमचा अभिमान धरून मसलत सेवटास नेणें व कांहीं अपटणांचेंहि मान्य करणें. त्यासहि साधन आहे. हा प्रकारहि बोलोन पाहाणें. फितुरी लबाड, कृत्रिमी, आह्मांस कैदेदाखल ठेवावयाची योजना करून अपटणांस अनेका प्रकारें समजावलें आहे. त्यांचा आंतील भाव बारीक अर्थ अपटणाचे ध्यानास आले नाहींत. सबब तुम्हीं जनरालापासून त्यास सुचवावें आणि या प्रकारची मसलतहि जनरालास कळवावी. हे अपटणास समजों न द्यावें आणि मसलत मारावी. हाहि कटकणा आहे. तूर्त अपटणानीं लिहिलें, हें तरी प्रत्यक्ष डौल कैद करावयाचा आहे. तेव्हां इंग्रजाचे घरीं आह्मी आलों असतां त्याचे श्वाधीन आह्मांस करून कैद करवितात हे गोष्ट त्यांचे अभिमानास उचित की काय ? फितुरियांनीं कृत्रिम करून बाह्यात्कारें दाहा लक्षांचा खर्च चालवितों, ऐसें समजाविलें. इंग्रज आम्हांपासून गेले ह्मणजे ते आपले खेळास चुकणार नाहींत. हे सर्व अर्थ तुम्हांस माहीत आहेत. येविसीं विस्तर कोठवरी ल्याहावा ? सर्व मदार जनरालावर आहे. प्रसंगास तुह्मी तेथें आहां. कळतील तैशा तोडजोडी बोलाव्या. इकडेहि वरचेवर कळवीत जाणें. जाणिजे. छ २०
मोहरम.

(लेखनावधि:)