Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसाब सपुत्रो ४.

लेखांक १३८.

१६९७ फाल्गुन वद्य ६.

पुाा रााा लक्ष्मण आपा :-
सु॥ सीत. आपटण व बारभाईकडून सलूखाचा पैगाम आला तो अलाहिदापत्रीं लिहिला आहे. त्यावरून कळेल. केवळच एक-कल्ली आहे. कैदेचा मजकूर आहे, हा आपटण समजला असेल किंवा नसेल. हजार राऊत व शागीर्द पेशा दोन-सें माणूस ते ठेऊन देणार. खर्च ते चालविणार. म्हणून उपकार. दाहा लक्षांतच सारें. परंतु त्याचीं माणसें ह्मणजे कैद, हें ते समजलेच नसतील. जनरालास सांगितल्यानें समजतील. त्यांचे मतें इंगरेजी काइद्याप्रों तीं माणसें आमचे हुकुमांत राहातील. तरी तसें नाहीं. कैदेचा प्रकार स्पष्ट दिसतो. दरमहा पंचवीस हजार ते धर्मादायाप्रों देतील तेव्हां देतील. ऐसा सलूख करून आम्हांस काय कर्तव्य आहे? दौलत करावी ह्मणोन अंगेराजाच आश्रय धरिला. त्यास, कैद ! तेव्हां दैव ह्मणावें ! तेव्हां हा प्रकार आह्मी कबूल करीतच नाहीं. जनरालही करणार नाहींतच. त्याची चर्चाच नाहीं. परंतु तहच करणें, तेव्हां भीमा, दुसरा गोदावरी, तिसरा गुजरात व तापी-उत्तर-तीर, देखील माळवा, ऐसें उत्तम, मध्यम, कनिष्ट प्रकारचा तह होईल तरी करावा. चवथा प्रकार तीन- ही होईनात, आह्मांजवळ तरी मसलत करावयास खजाना नाहीं, हैदर तरी पाठवीत नाहीं. चो महिन्यांनीं लक्ष आले तरी काय होणार ? तेव्हां एकटी गुजरात तरी निवळ आम्हांकडे असावी. परंतु हा तह पक्का नाहीं. गुतरातेंत गुजराण करून वर्ष दोन वर्षें राहूं. सारें दवलतीचा दावा आहे. तेव्हां याचा काट जनरालाचे हातून विलायतेस पक्का करावा. पातशाहा व कंपनी राजी करून, त्यांचा हुकूम हिंदुस्तानचे सारे जनरालास आणून मग आपले मनोरथ सिद्धीस न्यावे. गुजरात तरी फौजेचें व आमचें पोट भरावयास काल गुदराणीस पाहिजे. वरकड त्याणीं लिहिला प्रकार हा तर होणेंच नाहीं. याबद्दल मरण कबूल ! परंतु कैद पुरवत नाहीं ! निदानीं दहा लक्ष अंगरेज जनरालांनीं घेऊन आह्मांस रेवातीरीं भडोचेजवळ ठेवावें. रणगड बहुत मर्जीची जागा, तेथें राहून दाहाच घेऊं. परंतु त्यांचे कैदेंत राहाणें नाहीं. भडोचेजवळ रणगाडास राहूं. तेथे वर्ष दोन वरीस स्नानसंध्या करून काल नेऊं. राजकारणें विलायतेंतीलव हिंदची ज्यारी असतील, त्यांस अंगरेजांनीं मना करूं नये. अंगरेजाचे आश्रयानें राहाणें, ह्मणोन त्यांचे संमत पाहिजे. रणगड भडोचेहून सतरा कोस आहे. तेथेंच नेहमी राहूं. भडोचेहून साहित्य यावें. आह्मीही मजबुतीनें राहूं. दरमहा लक्ष रुाा ह्मणजे बारांत खर्च चालवूं. गुदराण करून राहूं डबाई वगैरे माहाल आहेत तो ऐवज बारांतच. हे केवळ कनिष्ठाहून कनिष्ठ प्रकार. परंतु तुटोंच लागले तरी जडावें, ह्मणोन तुह्मांस लिहिले आहेत. हे प्रकार जनराल त्यांसी पाहिल्यानें बोलतील तरी कांहीच होणार नाहीं. ते खचतील. यास्तव निदानींचा विचार होईल तरीच बोलावा. नाहीं तरी तोंडाची वाफ गमाऊं नये. याखेरीज सिबंदीचें कम-तरीन पन्नास साठ लक्ष देणें आहे. याची वाट जाहाली पाहिजे. याचा विचार जाहला पाहिजे. कळावे ह्मणोन सविस्तर लिहिलें आहे. हा प्रकार कोणासींच बोललों नाहीं. तुह्मांस मात्र च्यार पांच पर्याय सलुखाचे लिहिले आहेत. तेही खजाना नाहीं, लाचार आहों, स कमतीचा सलूख करावा लागतो. नाहीं तरी हे गोष्टच बोलणे उचित नाहीं. जाणिजे. छ २० मोहरम.

(लेखनावधि:)