Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १४१.

१६९८ चैत्र शुद्ध १.

राजश्री लक्ष्मण अपा :-
सु॥ सीत. लौकर वाचून जनरालासी व आणिक मायेचे कोशलदारासी व इष्टोरासी बोलावे याविसीं मनन करून बोलणें.

इंगरेजी सरंजाम लढाईचा बंद. याजमुळें मनसुबा रुतणीस पडला. यास्तव नबाब निजामअल्ली व धवशाचें राजकारण आह्मीं तयार केलें. त्याचीही अर्जी आहे. परंतु त्यास संवशय इंगरेजाचा आहे कीं, आह्मी श्रीमंताकडे जालों आणि बारभाईकडे अपटणाचे हुकुमावरून मुंबईकर इंगरेज जाहाले तरी मनसुबा सेवटास जाणार नाही. यास्तव जनरालांनी खातरजमा करावी कीं, आह्मीं रघनाथरावाचा पक्ष करूं, निदानीं बहुत संकट पडले तरी उगेच राहू. परंतु बारभाईचा पक्ष धरणार नही. असे लेहून द्यावें, ह्मणजे काम होते. विलायतेच्या हुकुमाचा पेच नाहीं. तो यावयास वर्ष पाहिजे. तोपावेतों बारभाईचीं पारपत्यें होऊन दौलत कायम होईल. सविस्तर बोलून पक्कें करून ठेवणें. येविसीं सुरतकर मोगलाकडून धवशाची खातरजमा करावी लागेल व देऊं, करूं तें देतील. येविसीही खातरजमा करावी. पुढें त्याजकडून तफावत होईलच, तेव्हां माघारे यावयास येईल. येविसी सविस्तर बोलणें. कलम १

खर्चास नाहीं, ह्मणजे वारंवार तुह्मांस लिहिलें. फत्तेसिंगाकडील ऐवजाविसीं लिहिलें. त्यावरून जनरालासी ताकीद करणें आली की पावती पाठवून देणें. त्यावरून गळीं लागले आहेत. सा। लक्ष भरणा कमपेश जाहाला, आणि दहाची पावती मागतात. इतके दिवस मनास येईल तसा रुपया उखळला. सारे इंगरेज एकमत होऊन एक साक्ष देतील. आह्मी तरी परिछिन्न पावती देत नाहीं. मनसुबा तरी, उरावर शत्रु. तशांत यासी वाद सांगणें प्राप्त. पावती द्यावी तरी च्यार लक्ष रुपये बुडवावे. येविसीं तोडजोड बोलून त्याचा कोणी इतबारी आल्यास आह्मांस चैन पडेल व च्यार रुपये मिळतील नाहींतरी नित्य कटकट कोठप रिंयत करावी ? त्यास तरी लोभामुळें सुचत नाहीं. दुसरा कोशलदारांतील अथवा गारडीन कोणी येता तरी आह्मांस पेच न पडता. तूर्त दुहीरी पेचांत आहों. येविसीं वारंवार किती ल्याहावें ? कलम १

सर्व भरंवसा जनरालावर आहे. परंतु त्याच्या बंदीमुळें दुसरी राजकारणें करावी लागतात. येविसीं हस्ते परहस्तें आमचें काम करूं, ऐसें पूर्वी जनराल तुह्मांसी बोललेच असतील. त्याच्या दस्तऐवजावर धरून बोलणें. जाणिजे. छ २९ मोहरम.

(लेखनावधि:)