Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसांब: सपुत्रो ४.
लेखांक १४३.
१६९८ चैत्र शुद्ध ६.
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसी:-
सेवक रघुनाथ बाजीराऊ प्रधान नमस्कार. सु॥ सीत सबैन मया व अलफ.
फत्तेसिंग गायकवाड याजकडील ऐवज सरकारांत द्यावयाविसींचा मजकूर जनरालाजवळ बोलिलों. त्यांणी ऐवज द्यावयाविसी किटिणीस लिहितों ह्मणून कबूल केलें. लिहिलें असेल. त्यास, फत्तेसिंगबाबतचा ऐवज जिन्नस व नख्त जें असेल तें किटिणीजवळ मागोन घ्यावे. न द्यावयाविसी जनरालाचा आग्रह नाहीं, ह्मणून लिहिलेंत. त्यास, येथे किटिणीकडून गाईकवाडाबाबत नख्त तो एक पैसा देत नाहीं. कापड व जवाहीर मिळोन चाळीस पन्नास हजारांचे आले आहे. त्यास, जवाहिरास विकून फौजेस पोटास द्यावे, तरी जवाहीर कोणी साहुकार घेत नाहीं. चाळीस पन्नास हजाराचें जवाहीर व कापडे याणें फौजेस दुजोरा पुरणार नाहीं. जवाहीर गाईकवाडाबाबत गाहाण ठेवून कोणी ऐवज देईल तरी पाहूं. एकंदर ऐवज देत नाहीं. फार पुसिलें तरी दिक्क होऊन परवानगी आणवितों, अथवा खर्च जाहला, ह्मणतो. शुद्ध बोलतच नाहीं. ++ येथें सरकारचा ++ सरदार असावा. इंग्रज ++++ पाऊण लाख ++ घ्यावें. नाहीतरीं ++ पाऊण लाख रुपये घेऊन सर ++ लाख रुपये द्यावें.++ सरकारचा कमावीसदार ठेविला नाहीं. महाल पावणेदोन लाखांचा. यास इंग्रजांनीं लाख रुपये सरकारांत द्यावे. साल-मजकूरचें येणें. हा मजकूर जनरालासी बोलोन ते लाख रुपये मागोन घेऊन हुजूर पाठवणें. अगर, येथें किटिणीकडून देवावे ह्मणून परवानगी जनरालाची पाठवून देणें.
असो. अंकलेश्वर काहीं अंग्रेजास दिल्हें नाहीं. पाऊण लाख रुपये मात्र दरसाल द्यावें, असा करार आहे. तोटानफा सरकारचा. हेंच आह्मांस पुरवलें. त्याचा आग्रहच असल्यास एक लक्ष रुपये सरकारांत मागावें. कलम १
सारांश खुलासा मजकूर. हरप्रकारें पांच चार, तीन, तरी लक्ष रुपये पाठवावे. कांही कुमक तोफा माणूस देऊन इष्टूर पाठवावा व लढावयाची परवानगी यावी ह्मणजे सत्वर कार्यसिद्धी होईल. सरकारची कामें व जनरालाचीं. दुहेरी नफे होतील. आमची सर्व मदार जनरालावर आहे. सविस्तर बोलणें जसें पुढें सांगतील तसें करूं. परंतु खर्चाशिवाय फौज रहात नाहीं. नाकर्तेपण येते. कळावे हे विनंति.
सुरतकर मागलाकडून चवथाईचा ऐवज येत नाहीं. याविसी जनरालासी बोलणें त्यावरून जनरालाजवळ बोलिलो. तयास जनराल बोलिले कीं, मोगलाचा मुलूक लष्करामुळें चोळटला, त्यास भक्षावयाचें मानसीक; याप्रमाणें बोलिलें, ह्मणून लिहिलें त्यास येथें खर्चाची वोढ, फौजेस पोटास नाहीं, सबब दिलगीर. गाईकवाडाकडील ऐवज हि इंग्रजांकडून येईना. सुरतकराचा हा तपशील. फितुरियांची फौज बारी उतरली. हरिपंतास ज्याबीतजंग घौशा मिळाला. तेव्हां ते जमलें. त्यांची फौज बारी उतरली. सबब, सुरतअठावीशींतील अंल झाडून उठला. रुपयास ठिकाण नाहीं. पोटाचा विचार काहीं सुचत नाहीं. सुरत अठ्ठावीशीतील सरकारचे परगणे व गायकवाडाकडील परगणे येथे ऐवज नेहमी नेमणूक आहे त्याप्रमाणें परगणियांतून पावला. ज्याजती व यंदा घेतला. १
दोन लाख रुपये येथें इंग्रजांनी कर्ज देतों ऐसें इंग्रेजांनी किटीण व हो दोघांनी हि- कबूल केले आहे, ह्मणोन तुह्मास लिहिलें. परंतु बोलिलें मात्र, पैसा एक दिल्हानाहीं. पुढेंहि मिळत नाहीसें दिसोन आलें. कलम १
सुरतेतील मोगलांने सालमजकुरी जाजती व ऐवज दर परगण्यांत घेतला. कोठें नेमणुकेप्रमाणें घेतला. कमी तरी कोठेही घेतला नसेल. परगरे चोळटले तरी त्यांस काही तोटा नाहीं. सरकारची व गायकवाडीची मात्र नुकसानी. त्याचा ऐवज गुंतला आहे तो घेऊन जाजती व घेतला. याप्रमाणें रुजू करून देऊं. जनरालांनी इतबारी पाठविल्यास होईल. गंभीर मात्र त्याजविसी लिहीत असतील. त्याचा अर्थ तर्काने समजावा. ऐवजाचा नफाच त्यास जाहाला. सरकारचा व गाईकवाडाकडील चौथाईचा अंमल सुरळीत होत नाहीं. पन्नास रुपये देऊन शंभराचे कबज मागतो. यास्तव आह्मी ऐवज घेत नाहीं. अगदी वसूलच पडला नाहीं.