Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १३९.
१६९७ फाल्गुन वद्य ७.
पारसी पत्र.
कारनेल अपटण यांस पत्र लिहिलें आहे त्याची नकल :-
तुह्मीं पत्र पाठविलें त्यांत तहाचा मजकूर लिहिला तो सर्व कळएला. ऐशास, आमचा व इंग्रजाचा तह जनराल व कोसल मुंबईकर यांचे मारुफातीनें कुंपनीचे मोहरेनसी करारमदार जाहाला तोच सर्वा इंग्रेजांनी सेवटास न्यावा. आह्मी कुंपनीचे सरकारांत करारमदार करून दिल्ह्याप्रो आमलांतही आणून दिल्हें. त्याजकडील आमचें कार्य राहिलें तेही तहनामियाप्रों सेवटास नेतील हाच भरंवसा आहे. कदाचित् तफावत दिसोन आलिया विलायतेस जाणें प्राप्त आहे. पेशजी परस्परें तह ठरला आहे, त्याखेरीज दुसरा मजकूर कसा घडेल ? तुह्मीं बंगाल्याहून आलेत, ते परस्परें फितुरियाकडे जाऊन त्यांचे सांगितल्याप्रों मनमानेसें लिहिलें, तेव्हां कबूल कसें करावें ? आह्मांजवळ येऊन, आमचेंही वर्तमान मनास आणून, मग जाबसाल करितां, तरी तुमची दूरदेशीं व वाजवीची चाल नजरेस येती. येक- पक्षींच ऐकोन, आह्मांकडील कांहीच मनास न आणिता लिहिले. त्यावरून अपूर्व दिसोन आलें ! त्यांणीं तहाचे मजकूर तुह्मांस सांगितले, त्यांतील दगाबाजीचे कुन्हे आहेत ते तुह्मांस समजले नसतील. सबब असें आह्मांस लिहिलें ते गोष्ट मंजूर पडणार नाहीं. छ २१ मोहरम.