Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसांब: सपुत्रो ४.
लेखांक १४५.
१६९८ चैत्र शुद्ध ६.
राजश्री लक्ष्मण आपा :-
सु॥ सीत. आजपर्यंत पत्रें लिहीत गेलों. तुह्मांस पावलीच. उत्तरेही आली. सेवटी निदानीं हे फळ दृष्टीस आलें. आतां काहीं तोड दिसत नाहीं. आपटणानें आमची व जनरालाची व कोशलदारांची आबरूच घेतली. आह्मी तरी सर्वस्वें बुडालों. गुजरात अमदाबादेखेरीज सोडविली होती तेहि हातची गेली. परम दु:ख ! काय ल्याहावे ? असो ! सांप्रत येकदोन पर्याय लिहिले आहेत. त्यांची उत्तरें जलद यावी. याप्रों तऱ्ही निदानी जनराल कोशलांनी करावें. पत्रीं काय लिहावे ? तथापि लिहिले असे. तूर्त जनरालाचे भेटीसच येतों. जनरालाची पूर्ती ममता व पुढे जनरालास भांडेस पाडून आपले काम करून घ्यावें. त्यास, त्याचे हाती कांही दिसत नाही. जप्ता आपटणानें ठराव केला तसेंच त्याणीं लिहिलें. तोडमोड देखील नाहीं. पुढे आह्मीं तेथें राहिलों तेव्हां दुसरा हुकूम आला कीं यास चौकीची माणसे देऊन पुण्यास पाठवणें. तेव्हा याणीं त्यास साफ ल्याहावें कीं, आमचे घरी जो येईल त्यास दुसऱ्याचे हातीं देणेंच नाहीं. हा दस्तुर इंगरेजी नाहीं. तरी आमचा बच्याव होऊन भडोचेसच चार साहा महिने विलायतेचा हुकूम येई तोपर्यंत पोटाची बेगमी करून ठेवावी, शागीर्दपेशा व हत्ती, घोडे मिलोन दरमहा तीस हजार तऱ्ही पाहिजेत. यांत त्यांची मर्जी. खर्चाविसी काय ओढावें ? परंतु शत्रूचे हातीं परिछिन्न देऊंच नये. निदानी यांचा उपायच नाहीं. लक्ष दोन लक्ष. निदानी कर्जवाम तरी देऊन हैदराकडे तऱ्ही पोहचतें करावें. हरयेक बहाना करावा. मागें बळ राहील त्यासही पोहाचाऊन द्यावें. पुढे कपालीं असेल ते होईल. कलम १ आंगरेजाप्रों थोर बलकट नाहीं ह्मणोन त्यांचा पक्ष केला. सेवटी आमचें कपाळानें घालविलें ! येविसी जनरालास काय शब्द ठेवावा ? दैव आपलें ! वारंवार जनरालास छळू नयें. दैव असेल तसे होईल. कलम कित्ता.
दहा लक्ष सिबंदीसुद्धा बारभाई देतात. इतक्यांचेच परगणे डबाई वगैरे रेवातीरी द्यावे. तेव्हा त्यांतच गुजराण करूं. दुसरा काय इलाज ? निदानीं काशी प्रयागाकडे लाऊन द्यावे. याप्रों आपटणास लेहून करवावें. कपालीं नसल्यास मग लटके हव्यास कशास करावे ? पण शत्रूचे कबजात राहणे यापेक्षा जीव जाईल तर बहुत उत्तम ! कलम १
आज मारवाडांत निघोन गेल्यास वाट फुटेल. हजार पांचशे दोनसें चाकरीस तऱ्ही येतीलच. परंतु तुमचे लिहिल्यावरून यांकडेच आलों. यांणी स्वस्थता करून ठेवावें. निदानीं हैदराकडे खर्चास देऊन पोहचवावें. कलम १.
सवासहा लक्षाचे जवाहिर गाहाण पूर्वी ठेविलें ते माघारे आमचें आह्मांस द्यावें. यास खर्चासही द्यावयाचें न होय, तरी साहा लक्ष गाहाण घेऊन, पांच चार लक्ष खर्चास देऊन, हैदरखानाकडे पोहचतें करावें. काम न जाहलें तेव्हां जवाहीर आमचें माघारे देतील. बेईमान नाहीत हे तर खातरजमाच आहे. कलम १.
निदानींचे पक्ष लिहिले आहेत. वाचून प्रसंगानुरूप बोलणें. आह्मांस परम भय सांप्रात जाहालें कीं, याच्याने किमपी हुकूम आपटणाचा मोडवत नाहीं. पुढें हे तरी परस्वाधीन. काय करितील न कले. तेव्हां आबरूवर आलें, त्यापेक्षा प्राण जातील तरी बरें. आबरू शत्रूचे हाती न जावीं. वरकड जे दैवी असेल तसेच समजून राहूं. सर्वस्वें बुडालों ! आता इतकीच इच्छा राहिली. जाणिजे. छ ४ सफर, चैत्र शुध्द शष्टी, सोमवार.
(लेखनावधि:)