Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ८.
१७०२ भाद्रपद वद्य ३०.
पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- ग्वालेरचे किल्यास्तव नजबखान बहुत कष्टी जाले व ह्मणाले कीं, आमचे स्वाधीन करता तरी किल्ला तुचा कायम राखिला जातो. आता तेथें कोठी करून गोहद व झांसी उज्जनपावेतों प्रांत घेतील. वैजापूरकर रजपुतांनी इंग्रजांकडून पैगाम केला आहे की एक कंपू जैपुरास पो, आह्मी पुढें प्रांत घेऊ. टोंक वगैरे ठाणी रजपुतांनी सरदारांची घेतली. आमचे नांव केलें. शेवटी आह्मांकडील महसूद अल्लीखान याणें ताकीद करून रजपुतांकडून ठाणी सोडविलीं असता...... ठाणी सोडून गेले. जागा खाली पडल्या आहेत ह्मणून नजबखानानीं मजकूर हाही सांगितला कीं, हेदरनाईकाची फौज काही इंग्रजाचे जिल्यास गेली होती, त्याची शिकस्त जाली, यास्तव आणिक फौजेस पाठविणार, भोंसले कटकाकडे गेले आहेत; परंतु कांहीं त्याजला जरब पोंहचली नाही. पुढे काय करतील व बातमी येईल ते सेवेसी विनंति लेहूं. याप्रमाणे उत्तर विनंति लिहावयास सांगितलें. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.