Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक ९.

१७०२ आश्विन वद्य ९.

पु।। श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- छ १९ साबानी इंग्रजांकडील वकील फाजलअल्लीखान नामें कांही जाबसाल घेऊन आला आहे. तात्पर्य हेंच की, आमचे कोठीस दिल्लीस आगरियास जागा द्यावी व खर्चास दोन लक्ष रु।। दरमहा घेत जावे. पूर्वील बंगालियाचे वर्षासनाचे बाकीचे शनि:शांति देऊं व कोठीस जागा द्यावी. याचे नजरेंचें ठरावयासी वकील खानमा। आला आहे. पुढे जो अंतस्थ ठरेल तो शोध घेऊन सो। पाठवितों. मुख्य गोष्ट पूर्वीपासून इंग्रज जागा कोठीस जैपूर दिल्ली आगरे वगैरे स्थली इच्छितात. आता ग्वाल्हेर त्यांचे हातास गेली. याकरितां इंगज सर्वा स्थली अंमल जाहालासें जाणतात. श्रीइच्छा प्रमाण ! यास्तव फौज या प्रांतीं जलदीनें आल्यास प्रिथ्वीपतीस खातरजमा होऊन इंग्रजांसी बिघाड करीत. हे स्थल सरकारचे व पातशाहाचे काबूंत राहतें, श्री स्वामीचे प्रतापें करो (न). कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.