Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक ७.

१७०२ भाद्रपद वद्य १४.
पौ।. छ २३ सवाल इहिदे
समानीन, ब।। अजूरदार.

श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी :-
विनंति सेवक पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ २७ माहे रमजान मुक्काम दिल्ली स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे. विशेष. सरकारचे आज्ञापत्र छ १ जमादिलावलचे आलें तें छ १ रजबी पावलें. पत्रीं आज्ञा की इंग्रज फार वदमामली आहेत. प्रथम गरिबीने गोड बोलून आपला कबजा करावा हे चाल त्यांची आहे. मागें चिनापट्टण व चंदनदावर वगैरे मुलूक त्यांणी हस्तगत केला. बंगाल पातशाही मुलूक घेऊन असफद्दौला यांसी कोणे प्रकारें सलूख राहिला, हे सर्व पातशहाचे ध्यानांत असेलच. या गोष्टी सर्व मनन करून, दक्षणचे सर्व रसासतदार एकविच्यारे होऊन, जागोजागा टोपीकरांसी ताण वाढविल्या. शिक्षा चांगलीच होईल. यांणी तुह्मी मिर्जा नजबखानबहादुर यांसी बोलून पातशहास विनंति करून टोपीकरांचे पारपत्याचा निश्चय करावा. पातशहानीं खेमेदाखल व्हावें. व नजरबखानानीं शीख वगैरे सर्व जमाव करून इंग्रजास तंबी करावी. समय हाच आहे. असफद्दौलाची दौलत हस्तगत जालियास नफे फार आहेत. सरकारतर्फेने गोहदप्रांती इंग्रजाचे तंबीस पंचवीस हजार फौज आहे व आणखी मातबर सरदार फौजसुद्धा रवाना करायाची तरतुदीत आहे. जलदीनेंच येऊन पावतील. व नजबखानासारिखे दूर-अंदेश हजूरमुखत्यार व नबाब निजामअल्ली सारिखे व आह्मांसारिखे फिरदवी एकनिष्ठ हुजूरचे एकविच्यारें असल्यास फिरंगी यांनी काय कर्णे आहे? राजेरजवाडे व निजामअल्लीखान व भोसलें यांस फरमान पाठवावा. व उभयतां सरदार गुजराथ प्रांती पन्नास साठ हजार फौजेनिसी व तोफखाना जंगी सरंजामसुद्धा इंग्रजांचे पारपत्यास जाऊन, त्यांची रसद बंद करावी. त्यांचे लष्करात दोन सेर धान्य आहे. इंग्रज मोठे संकटात येऊन पडले आहेत. ज्या दिवसीं सरदार निकड करतील त्या दिवशी इंग्रज जीवें वांचून जाणें कठीण पडेलसें आहे. व नबाब-नि-जामअल्लीखान-बहादूर याणीं सिकाकोळ बंदराकडे आपला पुत्र फौजसुद्धां रवाना केला आहे. व रा। रघोजी भोसले साहेब सुभा याणीं आपले बंधु रा। रघोजी भोसले सेनासुभा यांस बंगालियांत रवाना केलें. व हैदरखान चेनापट्टणाकडे जाणियास डेरेदाखल जाले. फौज रवाना केली. याप्रों। चहूंकडून ताण बसून पेंचांत येते, या गोष्टीने बहुत नफे आहेत, ह्मणून पातशहांस व नजबखानास समजाऊन अमलात येते कर्णे. ह्मणून विस्तारे पत्री आज्ञा. विस्तारवत आज्ञेप्रों। व यथामतीनें सर्पक सुचले ते पातशहास व नजबखानास श्रुत केले. बहुत संतोषी होऊन बोलिले कीं, आमचे मनोदयानुरूपच श्रींचाही इरादा आहे. परंतु तूर्त तथातथकरून इंग्रज सुरतेस गेले व सरदार उजरास इंदुरास आले. व गोहदेकडील सरदार आपलाले ठिकाणी गेले. आह्मी आपली फौज पाठवावी तर वर्षाकाळ, नदीनाले बहुडले आहेत. या दिवसांत फौज व तोफखाना कैसा जातो ? यास्तव वर्षाकाळानंतर श्रीमंतांचे सरकारची फौज आल्यास आह्मी फौज रवाना करतो.