Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
दशरात्र वायदा केला. त्यास वायद्यास खरे जाला. त्यावरून सदरहू रायरी मामलियाची सरदेशमुखी व दाभोळ मामलियाचे देशमुखीचे वतन कुळी देखील वडिलपण शिक्का तुमचा खरा करार जाहला. ऐसे मनास आणून तुम्हांस हे वतनपत्र करून दिले असे. तरी सदरहू दोन्ही वतने व हक्कलाजिमा, इनामत, इसाफत, मानपान, तश्रीफ, कानूकायदे पुरातन आहेत, त्याप्रमाणे तुम्ही आपले पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने अनुभवून सुखरूप राहणे. देवजी शिर्के यांस निमे वतन दाभोळ मामलियाचे वडिलपण शिक्यासी अर्थाअर्थी संमंध नाही. त्याजवळ दोन्ही वतनाची पत्रे आहेत ती रद्द असेत. येविसी कोण्ही हिंदू होत्साता विक्षेप करील त्यास श्रीवाराणशीमध्ये गोहत्या केलियाचे पातक असे. व कोणी मुसलमानही विलाहरकत करील त्यास मक्केमध्ये सुवर मारलियाचा सौगद असे. जाणिजे. छ २७ माहे जिल्काद. लेखनालंकार. सु।। खमस अर्बैन मया व अलफ, मार्गेश्र्वर बहुल त्रयोदशी, राज्याभिषेक ७१ रक्ताक्षीनाम संवत्सरी सदरहू अन्वयपत्रे.
१ रायरी मामलियाचे नांवे लिहून पत्रे.
१दाभोळ मामलियाची महालची नांवे
लिहून पत्रे.
१ राजश्री पंतप्रतिनिधि.
१ राजश्री पंतप्रधान.
१राजश्री पंतसचिव.
१राजश्री गोंदजी भोसले.
१राजनी तुळाजी अंगारे.
१मुद्राधारी लेखक किल्ले रायगड.