Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ७४.
श्रीबाळकृष्ण.
१६७० ज्येष्ठ शुध्द १२.
श्रीराजा शाहूचरणी तत्पर। माहादजी यादव निरंतर।
राजश्री पांडुरंगराम कमाविसदार खानगी गोसावी यांसी-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने ।। माहादजी यादव दिमत दरुनीमाहाल रामराम. सुहूर सन समान अर्बै मया व अलफ. ब।। देणे वेदमूर्ति राजश्री सदाशिव दीक्षित यांसी पालखीचे वतनाचे दुसाला सन सीत ८०० रुपये, सन सबां ८०० रुपये, येकूण दुसाला तिगस्तां व गुदस्तांचे रुपये सोळाशे देविले आहेत. मौजे नरवळे प।। दह्यांडे व मौजे रेळ प।। मलकापूर सदरहू दोन गांवच्या मुकासबापैकी सालगुदस्तांचे ऐवजी सोळाशे रुपये मारनिलेस पावते करून पावलियाचे कबज घेऊन तेणेप्रमाणे गांवच्या ऐवजी हिशेबी मुजरा पडतील. जाणिजे. छ ११ जमादिलाखर. बहुत काय लिहिणेॽ
मोर्तबसूद.
रुजू सुद
बार सुरू सुद बार.