Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
आपाजी बिन बि-१ पटबोजी पाटील ठोजी मान्ये, पाटील, मौजे वाघेरी प्रां क-कसबे रहिमतपूर, सो-हाड.
कोरेगाव, प्रांत वाई | १ रावजी पाटील |
१ काळोजी पाटील मौजे पळस देव प्रांत इंदापूर. |
गथाप प्रां सासवड, १ पाटील मौजे माणकेश्र्वर प्रो भुम सरकार परांडे |
येणेप्रमाणे पांचजण वतनदार हुजूर आणून तुम्हां हरदूवादियांचा करीना मनास आणून निवाडा करावयाची आज्ञा केली, त्यावरून पंचाइतांनी तुम्हां वदियांचा करीना मनास आणून राजीनामे व तकरीरा व जामीनकतबे लेहून घेतलियावर उभयतांच्या तकरीरा व उत्तरे परिसोन मनास आणितां, दोन्ही वतनांचे वडिलपण राजश्री रामोजी शिर्के यांचे खरे ऐसे पंचाइतमते होताच राजश्री देवजी शिर्के पंचाइतांस म्हणो लागले जे- रामोजी राजे यांचे पुत्र कानोजी राजे शिर्के यांणी श्रीकृष्णावेणीसंगमी उदकामध्ये उभे राहून उच्चार करावा जे, दोन्ही वतनांचे वडिलपण शिक्के आमचे, ऐसे बोलोन आमचे हातावरी पाणी घालावे आणि दशरात्र वायदा करावा, वायद्यास खरे जाहले तरी निमे वतनासी व दाभोळ मामलियाचे देशमुखीचे वडिलपण सिक्यांशी आम्हांस संबंध नाही ऐसे बोलिले. त्याजवरून तुम्हास पुसिले जे श्रीकृष्णावेणीचे दिव्य करितां की कायॽ त्यास तुम्ही विनंति केली की, आपण समस्त गोत पंचाईतमतेही निवाडियास रजाबंद होऊन क्रियेस रजाबंद होऊन जाहल तर त्यासही मान्य आहो. त्यावरून तुम्हां हरदुवादियांस जामीन वर्तावयाचे घ्यावयाची आज्ञा केली. त्यास पंचाइतांनी जामीन घेतले. तुम्हांस जामीन गोरखाजी बिन तुकोजी भापकर पाटील मौजे लोणी पो सुपे १ व राजश्री देवजी शिर्के यांसी जामीन मोकदम बरगे पाटील को कोरेगांव सा मजकूर प्रां वाई. येणेप्रमाणे तुम्हां हरदुवादियांस जामीन घेऊन मौजे खेड ता वंदन येथे श्रीकृष्णावेणीसंगमी मोरो आपाजी कलमदाने व आपाजी पाटील रहिमतपूरकर समागमे देऊन रवाना केले. तेथील वतनदार देशमुख व मोकदम व क्षेत्रींचे ब्राह्मण मिळोन तुम्हां हरदुवादियांचा करीना मनास आणून शालिवाहन शके १६६५ रुधिरोद्वारीनाम संवत्सरी माघ वद्य ५ भानुवासरी तुम्हांस व देवजी शिर्के यांस स्नाने करवून श्रीकृष्णावेणीसंगमी उभे केले आणि हुजरे व आपाजी पाटील रहिमतपूरकर व संगमीचे वतनदार देशमुख व मोकदम व क्षेत्रीचे ब्राह्मण तुम्हांस बोलिले जे काय असेल तो उच्चार करून हातावरी पाणी घालणे. त्याजवरून, तुम्ही श्रीकृष्णावेणीसंगमी उदकांत उभे राहून उच्चार केला जे- दोन्ही वतने वडिलांची होती ती कालगतीने बहुत दिवस भोगवटा तुटला होता, त्यास, आमचे बाप रामोजी राजे शिर्के याणी स्वामीसेवा निष्ठेने करून कष्टमेहनत वटकापैका वेचून दोन्ही वतने खादिली, वडिलपण शिक्का कुळी आमचा. ऐसा उच्चार करून देवजी शिर्के यांचे हातावरी पाणी घातले.