Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ७०
१६६२ फाल्गुन वद्य ५ (च्या पूर्वी). वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसी-
सेवक शिवभट साठे सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असावे. विशेष. आपलेकडील वर्तमान कळत नाही. तरी सविस्तर वर्तमान लिहित असावे. आम्हांकडील वर्तमान तरी सैन्यांत श्रीमंत सेनासाहेबसुभा यांजसमागमे असो. श्रीमंताचे येथे कन्येचे लग्न फाल्गुन वद्य पंचमीस मंगळवारचे असे. लग्नसिध्दि जाहल्यानंतर सैन्य बीडखरडे याजकडे जाणार. श्रीमंत पंत प्रधान यांजकडे पत्रे गेली आहेत. त्यांचे उत्तर आलियावर पेशवियाकडे जावे किंवा फिरोन मागारे नागपुरास जावे, ऐसा मनसबा आहे. पुढे कोण मनसबा होईल तो पाहावा. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.
लेखांक ७१
काशी श्री
सुमारे १६६२ मार्गशीर्ष. राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत स्वामीचे सेवेसीः पोष्य सखाराम भगवंत सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. विशेष. दौलतराव मुरार यांचे कनिष्ठ पुत्र व स्त्री ऐसी श्रीयात्रेस गेली. त्यांस ऐवज कांही खर्चास पाहिजे. सबब, राजश्री गोपाळराव गणेश यांजपासोन कर्ज श्रीक्षेत्री मा।। निलेनी घेतले. त्याचा फेडा करावयासी श्रीमंतांही रुपये हजाराची वरात आपल्यावरी दिल्ही आहे. ते दौलतराव यांचे पुत्र राजश्री खंडो दौलतराव यांही गोपाळरायापाशी दिल्ही. म।। निल्हे तुम्हांस पावती करतील. ते क्षणी रुपया आपण गोपाळरायास दिल्हियानी खंडो दौलतराव काशीचे कर्जापासोन मुक्त होतील. येविशीचे अगत्य आम्हांस आहे. तरी जरूर पत्र पावतांच सदरहू रुपये देवविले पाहिजेत. बहुत काय लिहिणेॽ लोभ असो दीजे. हे विनंति.