Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ७२
श्री.
१६६६ मार्गशीर्ष वद्य १३.
१ मुख्य पत्र नांवाचे राजश्री कानोजी राजे व कुंवरजी व बहिरजी व जैसिंग व वाघोजी व उदतसिंग व बाजी बिन रामोजी राजे शिरके सरदेशमुख मामले रायरी व देशमुख मामले दाभोळ माहाल बितपशील.
मामले रायरी | मामले दाभोळ |
१ता निजामपूर | १ता। हवेली दाभोळ |
१ता गोरेगाव | १ता। वेळंबा |
१प्रा महाड | १ता। केळशी |
१ता नाते | १ता चिपळूण |
१ता कोढविसीमहाल | १ता पंचनदी |
१ ता बिरेवाडीसी माहाल |
१ता सावर्डे |
१ ता हिरढस मावळ | १ता वगैबी |
१ ता कालंड खोरे | १ता खेड |
१ता मोसे खोरे | १ता गुहागर |
१ता पौड खोरे | १ता नाते |
१ता जालगांव | |
१० | ११ |
याचे दिल्हे वतनपत्र ऐसीजे. तुम्ही शाहुनगरनजीक किल्ले सातारा येथील मुकामी स्वामीसन्निध विनंति केली की- सदरहू दोन्ही वतने पुरातन आपले वडिलांची होती. त्यास, कालगतीकरितां कित्तेक दिवस चालत नव्हती. त्या उपरी महाराज राजश्री राजारामसाहेब या समागमे आमचे बाप राजश्री राजे शिरके चंदीस जाऊन, कष्टमेहनतीने एकनिष्ठपणे सेवा केली. त्यावरून महाराज स्वामी कृपाळू होऊन सदरहू दोन्ही वतने अजरामतरामत करून वतनपत्रे करून दिल्ही. त्याप्रमाणे आपले बाप राजश्री रामोजी शिरके यांनी वतन अनुभविले व हल्ली आपणही अनुभवही असो. आमच्या बापास महाराजांही राजश्री बाळाजी विश्र्वनाथ प्रधान यांसमागमे रवाना केले होते. ते स्वामीकार्यावरी जुंझी पाहिले. आम्ही लहान होतो, ते समई राजश्री देवजी राजे शिरके व आमचे चुलते राजश्री विठोजीराव शिरके व राजश्री दौलतराव शिरके या त्रिवर्गाचा कजिया वतनसंबंधाने लागला. तेव्हां महाराजांही आज्ञा केली जे, तुम्ही आपले घरांत समजणे. ते आपले घरांत न समजतां महाराजांस विनंति केली की, वतन विभाग करून आम्हांस दिला पाहिजे. त्यास उभयतांचा करीना मनास आणितां महाराजांही हरदुजणांस वतनपैकी राजश्री देवजी शिरके यांस निमे वतन दाभोल मामलेयाचे देशमुखीचे वडीलपण देऊन वतनपत्रे करून दिल्ही. त्यास, आम्ही प्रबुध्द जाहलियावर देवजी शिरके यांजकडे निमे वेतन वडिलपण शिक्का चालो दिल्हा नाही. पुरातन वतन वडिलांचे खरे. कालगतीने मुतालिक पातेणा प्रभु रायरी मामलियाचे वतन अनुभवीत होता. ते आमचे बापे त्यासी वाद सांगोन खोटे केलियावरी कष्टमेहनेतसेवा करून वटकापैका वेचून वतन अजरामरामत करून घेतले. त्यास, राजश्री देवजीराव शिरके व राजश्री विठोजीराव शिरके व दौलतराव शिरके यांसी वतन विभागून द्यावयास संबंध नाही. जे देणे ते वडीलपणे आपण देऊं. महाराज यांनी पत्रे करून दिल्ही आहेत, त्याअन्वये राजश्री देवजीराव शिरके आम्हांसी कजिया करितात. याजकरितां महाराजांही त्यांचा व आमचा करीना मनास आणून निवाडा केला पाहिजे, म्हणोन विदित केले. त्याजवरून, तुमचा व राजश्री देवजी राजे शिरके यांचा करीना मनास आणून निवाडा करावा यास पंचाइत नेमून दिल्ही. बितपशील.