Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ६९.
श्रीसुबराज.
१६६१ कार्तिक वद्य १.
श्री राजारामचरणी मालोजी घोरपडे ममलकतमदार सुबराज।।
राजश्री नागोजीराव पतकी कमाविसदार सेणगांव ता खानापूर गोसावी यासी-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य रा हिंदुराव घोरपडे ममलतमदार सुहूर सन अर्बैन मया व अलफ. वेदमूर्ति राजश्री रामचंद्र दीक्षित व सदाशिव दीक्षीत ठकार वास्तव्य पाठगांवकर याणी मिर्जेच्या मोकामी आमच्या भेटीस येऊन विदित केले की, सेणगांवपैकी सरदेशमुखीच्या ऐवजी जकायतीपैकी दर गोणीस रुक्के ३ तीनप्रमाणे पूर्वीपासोन करून दिल्याप्रमाणे चालताहेत. सांप्रत आपले तीर्थरूप बाबा दीक्षित निवर्तले. आपल्या नांवे ताकीद पत्रे देऊन पूर्वप्रकारे चालवावे, म्हणून सांगितलेवरून हाली हे सनद सादर केली अस. तरी तुम्ही ताजे सनदेचा प्रतिवरुषी उजूर न करतां पूर्वप्रकारे चालत आल्याप्रकारे दर गोणीस रुक्के तीनप्रमाणे सर जकायतीच्या ऐवजी बिलाकसूर पावीत जाणे. हुजूर न करणे. जाणिजे छ १४ शाबान. पा हुजूर.
शिक्का.
सुरुसुदबार.