Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
१ फुगारे. मूळपुरुष परमाजी फुगारा आणगराहून आणला. त्यास जमीन दिल्ही कसबे मजकुरी चावर.
१भगरे. याचा मूळपुरुष काळोजी भगरा. याचा ठिकाण मौजे शंकरगावचे पाटील तेथे मारा जाहला त्याची मातोश्री भोगवडा चौगुला कामाची कन्या गरोदर होती ते शंकरगावी मारा जाहला त्यामुळे तेथून पळून माहेरास कामारी आली ते प्रसूत जाहली. तिचे पोटी काळोजी बिन बाबाजी भगारा उत्पन्न जाहला. त्यास कामारी ताबेळपटीस भोई याची मिरासीची जा ६|| होती ते भगार मारास करार करून दिल्ही.
१ हाजार. याचा मूळपुरुष विठ्ठल गागद्या हाजारे. याचा मूळ ठिकाण बावची. तेथ मारा जाहला, सबब त्याची मातोश्री गरोदर होती ते कामजकुरी येऊन प्रसुत जाहली. तिचा पुत्र विठ्ठल गागद्या उत्पन्न जाहला. त्यास कसबेमजकुरी पटी भालेवाडी कुरण सरकारी जमीन १|| दीड चावर हाजारे मजकूर याचे जिमे करून दिल्हे.
जटाळ. याचा मूळपुरुष येमाजी जटाळ. याचे मूळ ठिकाण कडलास, तेथून आला. त्यास कसबेमजकुरी जमीन ३ मशारनिलेच जिमे केली.
१|| पटी बोराळी.
१|| पटी भालेवाडी नजीक
३ एकवीरा.
१.उनाळे. याचा मूळपुरुष गावडदेव याचा मूळ ठिकाण मनेराजोरीहून कसबामजकुरास आला. त्यास पुत्र २. १ वणगोजी व धुळोजी उभयता जाहाले. त्यास कामजकुरी जमीन भिको पा वाकडा याचा १| मशारनिलेस पटी बोराळी सटवाई || २६ करार करून दिल्ही व ब्रह्मपुरी पटी पो करनळ जमीन ||| १५ एकूण दीड चावर आकरा बिघे मशारनिलेच जिमे करून दिल्ही. जागा नांदावयास, महाल शेटी दुखोल्या गतकुळी जाला, सबब मशारनिलेचे हवाली केली.
१ कोंडो बहिरो. याचा मूळपुरुष बहिरजी व कानोगदे. कोंडो बहिरो याचा मूळ ठिकाण बेदर. तेथून कसगावडा यानं आणून आपले खास मिरास पो जमीन ३८७ व वरील पटी भालेवाडी पैकी जमीन |||२७|| मानिले.
४६४।।