Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पोमाजी विसो सुरो याचा मूळपुरुष चांदारस्तापुराहून आला. त्यास कसबे मजकुरी पटी बोराळी जमीन चावर २|| त्याचे जिमे करून दिल्ही.
१ चौधरी याचा मूळपुरुष बिल्होबा चौधरी यास गंगातीराकडून आणला. त्यास कसबे-मजकुरी जमीन २|४ पटी बोराळी पैकी जमीन जिमे करून दिल्ही.
१ महाजन याचा मूळपुरुष ळुकावा! त्याचा पुत्र नागावा. त्याचा पुत्र हबाबा महाजन यास कानुराहून आला. त्यास कसबेमजकुरी जमीन पटी भालेवाडी १||४ मशारनिलेचे जिमे करून दिल्ही.
१ खराडे याचा मूळपुरुष भाऊ २. १ दामाजी व लिंगोजी. पैकी लिंगोजी कामारीहून कामती पो मंदरूप येथे गेला. दामाजी मात्र कसबेमजकुरी राहिला. त्याचा मूळ ठिकाण गोरगाव येथून कसबेमजकुरास येऊन जमीन आपले जिमे करून घेतली. ३८४ पटी ब्रह्मपुरीपैकी जिमे करून दिल्ही.
१ वाकडे याचा मूळपुरुष लखो वाकडा. आणगराहून कसबे मास आला. त्यास जमीन जिमे करून दिल्ही. थळेपटी ब्रह्मपुरी.
२|सिबेस लागन
१|१० रानमळा गव्हाणण
------

३||१०

१ पाद-या याचा मूळपुरुष आपदेव अणगराहून कसबे मजकुरास आला. त्यास जमीन जिमे करून दिल्ही पटी ब्रह्मपुरी.
१८१५

१ भागे याचा मूळपुरुष दशमण सोमदेव भागे अणगराहून कसबे मजकुरास आला. त्यास जमीन पटी ब्रह्मपुरीपैकी व मो २|||
८१५ वरील पटी भालेवाडी
-------

२|||१५
येणेप्रमाणे मशारनिलेचे जिमे करून दिल्ही.