Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
१ जोशी ब्राह्मण याची मूळ ठिकाण पळूस येळाई एथून कसबेमजकुरास आला. नरसिव्हभट जोशी.
१ जावळे मूळपुरुष तुकद्या बिनकाबद्या धाराशिवाहून कसबेममजकुरास आणोन त्यास कसबेमजकुरी जमीन चावर दिल्हे.
१ रेव शेटी ढेवण यास बेताळीहून आणोन कसबेमजकुरी चौगुलकीचे वतन देऊन जमीन मशारनिलेचे जिमे करून दिल्ही.
१ बाबाजी पाटील शेवडा यास चौगुलकीचे वतन देऊन जमीन मिरासपटी ब्रह्मपुरीपैकी ३||| पावणे चार चावर जमीन जिमे करून दिल्ही.
१ काटकर याचा मूळपुरुष नागोजी चिंगो मालो काटकर. याचा ठिकाण कुकुडवाड. येथून त्याची मातोश्री राहीजी नेवा पाटील आवताडे याची कन्या ते गरोदर होती. कुकुडवाडी मारा जाहला, त्यामुळे ते बायको पळोन माहेरास कामारी आली. ते प्रसूत जाहली. तिचे पोटी पुत्र माळो काटकर जाहाला. त्यास कामारी कट्याळा याची मिरास बोराळपटीस जा २८३ होती, ते मशारनिलेचे जिमे करून दिल्ही.
१ घाटोळे याचा मूळपुरुष विठोजी कदम, याचा मूळ ठिकाण तुळजापूर, येथून मशारनिला आणला. त्यास कामारी जमीन ७ तास चावर जिमे करून दिली.
६|||पटी ब्रह्मपुरी
१|| शिवेस
१||रवा
-------
३|||मधील
पट्टी तांबोळीवरील
-----
७
१ घुले याचा मूळपुरुष विठोजी घुला. याचा मूळ ठिकाण तुळजापूर. तेथून येऊन कामजकूरची जमीन जिमे आपले करून घेतली. तपशील
४|||२२ पटी ब्रह्मपुरी
१|१७ गव्हाण
३||५ खालील
----------
४||||२२
१ कळसोजी घुला तुळजापुराहून आला. त्याचे जिमे जमीन मिरास करून दिल्ही. २| पटी बोराळी सदरहू मशारनिले याची अवलाद मौजे मरवडे येथे मिरास करून नांदत आहेत.
१ कालत्या याचा मूळ ठिकाण तुळजापूर एथून आणून कसबेमजकूरची जमीन जिमे केली. बीतपशील.
२||१२ पटी बोराळी जा
१|१२ को वरील
१|खालील
२||१२
२||| पटी तांबोळी बदल महाळूम
ना.
-----
५|१२