Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २५९.
छ १ शवाल.
१७०२ भाद्रपद वद्य २.
श्रमिंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
सेवक रामचंद्र कृष्ण रिसबुड सा नमस्कार विज्ञापना. तागायत छ १५ माहे रमजान मुकाम आदवानी नजीक, नबाव बसालतजंग, जाणोन वर्तमान यथास्थित असे. विशेष. येथील वर्तमान छ २३ साबानीं जासूदजोडीसमागमें विनतिपत्रें व नबाबचे इनायतनामे सहीत रवाना केले ते पावोन सेवेसीं अर्ज जाली असेल, अलीकडे छ १० माहे रमजानीं सेवक दरबारीं गेलों असतां, नबाव अमीरूलउमराव यांणीं खलबतींत च्यार घटिका बोलिले कीं, गटुंरचा तालुका नवाब निजामद्दौलाबहादरे यांणीं आपणाकडे करून घ्यावयाविस इंग्रज फिरंगी बंगालेकर यांसीं जाबसाल लाविला आहे कीं, सरकारांत घ्यावा. आह्मांस ह्मणतात कीं आह्मीं सरकारांतून ऐवज नक्त देऊ. येविशीं आह्मी मुकरर अर्जी हुजूरांत केली आहे कीं, आपण पहिलेपासोन सर्फराजी केली आहे, त्याप्रो अमलांत आणावें. कदाचित् गंटुर तालुका सरकारांत ठेवणें मंजूर असलियास त्याचा ऐवज आह्मांस द्यावा. महाल लाऊन द्यावे. कारण कीं, आह्मांस पहिलेपासूनच जुम तालुका बहजार दिलात. कारवाई होते. तालुकियावर दामसुके करून देऊन व तनखा करोन देऊन कारवाई होते. नक्त ऐवज सरकारांतून देऊं ह्मटलियास येथील निकडीनें वारंवार अर्ज मारून करावे लागेल. याअर्थी ते गोष्ट ठीक नाहीं. कृपा करोन पहिलेपासोन सर्फराजी आहे. त्याप्रों ऐवज तालुका अथवा तोच महाल ठीक करोन, आमचा आह्मांस द्यावा. येविषयीं आपण हुजूरांत सई व कोशिस करून नबाबा स लिहिलियाशिवाय मामुलप्रों अमलांत येत नाहीं. येविषयीं राजश्री जिवाजीपंत वकील सरकार यांस लिहून हुजुरांत काम होऊन ते गोष्ट करावी. येविशीं, राजश्री कृष्णरावजीकडून लिहावें, म्हणजे कामाची बरामद होईल. आह्मी सर्व प्रकारें श्रीमंताचें मर्जीशिवाय व हजरत बंदगानअल्लीचे मर्जीशिवाय नाहींत. ज्यापक्षीं उभयपक्षीं सल्ला, तेच आमची सल्ला, सल्लाप्रों वर्तणूक करोन हुजूरचे आश्रयाची बड आहे. यास, येविषयीं पूर्वी लिहिलें आहे. व हालींही पत्रें व इनायतनामे पाठविले आहेत. पत्र पावतांच डाकेसमागमें मुसनापत्रें पाटवावीं म्हणोन बोलले, व म्हणाले कीं, येविषयीं आपण सई करोन बोलिल्याशिवाय बंदोबस्त होऊन, काम चालणार नाहीं. म्हणोन बहुतां प्रकारें सांगितलेवरून सेवेसीं विनंती केली आहे. त्यास, स्वामीनीं साहित्य केली. याशिवाय परिणाम दिसत नाहीं. छ ११ माहे मिनहून सुतरस्वार हैदरअल्लीखानबहादर यांजकडून वर्तमान आलें कीं, आरणीचा किल्ला घेऊन अर्काटेसमीप उतरलों. मोर्चे लाविले आहेत. आजपर्यंत अठरा किल्ले घेतले व वेळूरचा जाबसाल भेद केला आहे म्हणोन बोलत आहेत. छ १२ माहे मीनहूस सेवक दरबारीं रात्रीं दीड प्रहरीं नबाबाकडे गेलों असतां, नबाब बोलले कीं, काल रात्री बहादर यांचे लष्करांतून कोणीं लिहिलें आहे कीं, पहिले कडाचुरी नंदराज श्रीरंगपट्टणकर याजपासोन कर्ज घेतलेबा रुा एक क्रोड व्याज सहीत व त्रिचनापल्लीचा किल्ला द्यावा. दिलीयास सलुख करावा. ऐसें मानस दिसतें. म्हणून तेथून वर्तमान आलें आहे. म्हणून बोलत होते. पुढें दाहा हजार फौज चिनापट्टणावरून रवाना केली आहे व राजश्री उत्तमराव व इत्ययारखान यांस हैदरअलीखान यांनी रुकसत केलें. दोन चार दिवसांत येणार म्हणून उत्तम सुतरस्वार तेथून पुढें आला. त्यानें वर्तमान सांगितलें व पत्रें ही अलीखानबहादुर यांणी कर्नाटक प्रांतीं लूट केली व महमूद बंदर येथील हत्ती वगैरे आणले. म्हणून पेशजी विनंती केली आहे. गोठुर प्रांतींहून वर्तमान सावकारी लिहिलीं व लोक बोलतात की, मीर हैदर अलीखानाकडील यांणी गोठुरचे तालुकियांत स्वारी करून जमीदारांचे भेदानें तमाम मुलखांत अंमल आपला केला. व फिरंगी कांहीं पंचवीस पन्नास व बार दोन च्यारसे गार्दी होते. ते मंगळगिरीकडे निघोन गेले. म्हणोन वर्तमान आहे. येविषयीं नबाबासही विचारलें असतां, बोलले की, आमचें वर्तमान कांहीं आलें नाहीं, लोक बोलतात. भागानगराहून वर्तमान आहे कीं, सुरतेकडील फिरंगीयास चिनापटणकरांनीं बोलाविलें असतां, उत्तर पाठविलें कीं, इकडे काम कांहीं जालें नाहीं, मग आमचें येणें कोणे प्रकारचें होईल ? ह्मणून वर्तमान आहे. व कोकणपट्टींत फिरंगी इंग्रज बंदरकिनात्यानें पुण्यापासोन सोळा कोशीं आहेत, म्हणोनही भागानगरचे आंखबारेंत होतें. येथील वर्तमान पेशजीं कपटराळचा किल्ला नबाबाचे फौजेंत घेऊन किल्ला पाहून बरोबर करून पुढें कोडदुरास फौज जाऊन महासरा केला आहे. व मीरमुबारकखान सक्दरजंग हे नबाब निजामद्दौल्लाबहादर यांजकडून पेशजीं आले. ते अद्यापि येथेच आहेत. छ १३ माहे मीनहस दरबारी गेलो असतां, नबाब बोलले की, तुम्ही श्रीमंतास व आपणास आम्हांविषय बहुत प्रकारे लिहावें की, गोटूरचे जिलियांत अथवा ऐवज महाल होत ऐसें करावें. आम्ही सर्व प्रकारें आम्हीं आपले फौजेनिशीं आपले आहोंत. पुस्तेज्यापासोन घरोबा आहे साहिता केलियाप्रमाणें ह्या जाबसालास मामुलप्रमाणें अमलांत येते. योजना करून लिहोन अमलांत ये तें करावें. त्याजवरोन विनंती केली आहे. नवावानीं आपली जोडीही दिल्ही आहे. मी बोललों कीं, आमची जाडी पाठवीतच आहे, हें कशास पाहिजे? त्याजवरोन बोलले कीं, काम जरूरी, आपली जोडी व सरकारी जाऊन सत्वर उत्तरें घेऊन येतील. म्हणून पाठविली आहे. नबाबांनीं इनायतनामा आपणास एक व तीर्थस्वरूप राजश्री कृष्णरावजीस इनायतनामा व राजश्री हरीपंत तात्यास खलिता ऐसे घेऊन सेवेसीं पाठविले आहेत. येऊन पोचतील. जासुदास रोजमुरा द्यावयास आज्ञा करावी. उत्तराचीही आज्ञा होऊन रवाना करावें. पेशजीं तीन जोड्या जोडीमागून जोडीरवाना करीत गेलों. परंतु फिरोन एकही जोडी सेवकाजवळ आली नाहीं. राजमुरेविशीं फार विलंब लागतो. वरचेवर पावत नाहींत. येथें महर्गता फार आहे. मागील रोजमुरे बाकी राहिले ते हाल्ली ऐसें देऊन पाठवावें. सेवकास एथें येऊन एक वर्ष झालें. अद्यापि नेमणूकचिट्ठी व जहागिरी गांवचा बंदोबस्त व खर्चासही कांहीं सरंजामी होऊन येत नाही. यामागेन आजपर्यंत कर्ज सावकारी खादलें. त्यास देण्यास कोठें ठिकाण नाही, आणि नित्य खर्चास पाहिजे. त्यास, साहेबीं कृपा करोन नेमणुकीची चिठी व जहागिरी गांवचा बंदोबस्त करोन व खर्चास हुंडी चिठी नारायण पेठेची करोन पाठवावी. येविषयीं वारंवार विनंती करावी. यास स्वाम सर्वजण आहेत. साहेबाशिवाय संरक्षण कसें होतें ? साहेबाचे मर्जीस ज्याप्रमाणें कृपा करोन बंदोबस्त करोन पाठवावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.