Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २६३
श्री.
१७०२ मार्गशीर्ष वद्य ३.
राजमान्य राजश्री विठल शामराज गोसावी यांस:-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुा इहिदे समानीन मया व अलफ राजश्री तुकोजी होळकर इंदुराहून निघाले आहेत. त्यास बोलाऊं पाठवून सरकार कामावर यावें, म्हणून गंगाजल निर्मल अहिल्याबाई होळकर यांणीं तुह्मांकडून हुजूर लेहविलें. त्यावरून इंग्रजाचे मसलतीस लौकर फौजसुद्धा नमृद व्हावे, म्हणून त्याजकडे पत्रे पाठविली त्याप्रो ते कूच करून दरमजल सैधव्यानजीक आल्याचे वर्तमान आले. त्याजवरून जलद खानदेशांत येऊन, केसो कृष्णाचें पारपत्य करून, लांब लांब मजलीनें, वसईकडे इंग्रजांनीं दाट करून लढाई सुरू केली आहे, तिकडील उपराळयास सरकारच्या फौजा गेल्या आहेत, तुह्मीं लौकर जाऊन पोंहचून सरकार काम करणें, म्हणून त्याजकडे पत्रे गेली आहेत. त्यापों ते जातील. अहिल्याबाईनीं तुह्मांस सांगून लेहविलें, त्यावरून मारनिल्हेस लौकर बोलाविलें. सरकारमसलतीचे समई आले. परंतु, त्याची व अहिल्याबाई यांची भेट जाली नाहीं. त्यास, त्याज कडील पत्रें आलीं व रा बळवंतराव वांकडे व रखमाजी दादाजी आले. त्यांच्या सांगण्यांत अहिल्याबाईची अमर्यादा कर्तव्य नाहीं, सरकार चाकरीची आज्ञा होईल तसें करावयास......यामध्येंच अर्थ आहेत. त्यापक्षीं अहिल्याबाईनीं दुसरा अर्थ मनांत आणू नये. पहिले मामलेदार असतील किंवा नवे त्यांनी केले असतील, त्यांची घालमेल करूं नये. मामलेदारास ताकीद करून वरचेवरी मारनिलेकडे खर्चाची पुरवणी होय असें करावें. येविसीं अहिल्याबाईस अलाहिदा पत्रें पाठविलीं आहेत. तुकोजी बावा येथील आज्ञेवरून निघाले नाहींत. इंदुराहून निघाल्यावर त्यास येथील अमर्यादा न होतां सरकार चाकरीवर न्यावें, ह्मणून अहिल्याबाईनीं तुह्मांकडून लिहविलें. त्याजवरून त्यास लिहिलें. ते येतात असें असतां, अहिल्याबाई मनांत वांकडें कां आणतात ? तुकोजीबावा येथें आल्यावर बाईची मर्यादा रक्षीत असाच (उपदेश ) होईल. बाईचे ठाईं येथें दुसरा विचार नसतां, तुकोजीबावा मसलतीस आले. मागें मामलतीच्या धालमेली व जपत्या होऊ लागल्यास त्यास चाकरीची उमेद कैसी होईल ? सरकारांत मसलतीचे उपयोगीं काय पडतील? फौजसुद्धां मसलतीस आले. त्यास विरुद्ध वाटे असें केल्यानें सरकार काम नासतें, हें समजोन कोणतीही घालमेल करूंच नये. या प्रमाणें तुह्मी बाईसीं बोलून, तुकोजी बावांस विरुद्ध न वाटे असें करणें.
( खास दस्तुर ) 'सरकारकामावर सर्वांची दृष्टी असावी. बाईही फार समजतात, तेव्हां वांकडें पडे असें होणार नाही. रा १७ जिल्हेज.