Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २५७
( मुसाभुसी याचे पत्राची नकल ) श्री ( नकल ) १७०२ आषाढ वद्य २
जहांमगव अवालिमरतबात शोकतमाली मनलतमुलान मेहरबान मदारुलमहाम बाळाजी पंडित मुबक मोहवतहूं:-
छ १५ रजब पावेतों दरजागा गुडालूर खैर आफियत जाणोन आपली षादमानी हमेशा कलमी करवीत असलें पाहिजे. दिगर इंग्रेजांनीं बहुत गरमी यंदा तिकडे......करून खुष्की तमाम काबीज केले. आणीक करीत जातात. याजकरितां खुषकीचे तमाम सरदारांनीं इंग्रेजास तंबी करून खुषकींतून त्याजला खेरीज करावें. ह्मणून नकष ठराऊन त्याजप्रमाणें इंग्रजावर चहूंकडोन खुषकीवर मोहीम केली आहे. दर्यांत इंग्रजांची जहाजें वगैरे आहेत. त्यांचे तंबीबद्दल फरासीसांची जमियत पाठवणें. परंतु मसलत करून नवाब हैदरखान बहादर इज्जतमकान याजकडून फरांसिसांच्या पातशाहास व वजीरासही ते खत लिहून मुजरतमहाम वगैरे पाठविले. करितां पेशजीं मुसे सोडोब व मुसे खुषमैन बा फरासीसांचे जमियत रवाना करून पाठविले होते. त्यास हाली आम्हांसही सात हजार सालेदातसहित रवाना करून पाठविले. याकरितां आह्मीही गुडलुरास येऊन तीन महिने जाले. आह्मीं पाहिजे तसा सामान सरंजाम व तोफखान्याचे बैलावर चारीच घोडे व खबरदारीकरितां बैल उंटें वगैरे खर्चास नकद व खाणेचा सरंजाम नबाव फत्तेअळीखानबहादूर यांणीं करून दिल्हा आहे. आह्मी आपली जमियत व नबाब मौसूफ यांची जमियतेचें इत्तिफाकानें अनकरीब चेनापट्टणचें मकान घेऊन, इकडील इंग्रजास तमाम गारत करून, तैसेच मुंबईकडे दर्याचे राहानें मुसासुफरूनें यांस जाहाजासुद्धां रवाना करून पाठवून, आह्मीं खुषकीचे रहानें येत असों, खुदाचे फजलेकडून मुंबई वगैरे मकाने घेऊन रावपंडितप्रधान यांचे तालुके मकानांत वगैरे इंग्रजानें घेतले आहे तेंही सहजाणें सोडून दिल्हें जाईल. आह्मीं आलों तें पाहून, इंग्रज आपले जागां घाबरा होऊन, खुषकीचे सरदारांशीं फोडाफोडी करून, आपणाकडे करून घ्यावें ह्मणून या तजविजेंत आहेत. त्याची तजवीज आपण आपले करारमदारावर कायम राहून, तिकडे इंग्रजांत तंबी अंमलांत येईतसें करावें. आमचे व आपले इत्तीफाकानें इंग्रजाचें नांव निशाण नाहीसारखें नेस्तनावृत होतील. आनि बहुतां दफन होतील. आपण हें काम रातीवानें, बनांव दूरंदेशी आहेत, कलमी करावें असें नाहीं. इंग्रजाकडील हमीष्टवीन गरनल......व असीर जाहले आहेत. त्यास सोडून द्यावें. त्यास कैद करून ठेविलें...इंग्रजाकडे रघुनाथराव आहेत. त्याचा बदला होत आहे. आह्मांस आपले दोस्त जाणून हमेषा आपली षादमानी कलमी करीत आलें पाहिजे. जिआदा काय लिहिणें असे?