Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २५६

श्री.
१७०१ माघ वद्य

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारोपंतनाना स्वामीचे सेवेसीः-

पो बाळाजीनाईक भिडे सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष राजश्री नारायणराव गोविंद हे राजश्री पाटिलबावांकडे पाठविले होते. त्यांसीं बोलोन येथें आह्मांकडे आले. त्यास त्यांच्या बोलण्याचालण्यांत पाटिलबोवांसीं आलें आहे. तें सर्व आपल्यास निवेदन करतील. तें ध्यानांत आणून, त्या दरबारचा बंदोबस्त पक्के रीतीचा करून, सेनाखासखेल यांचे निदर्शणांत येई तें करावें. सर्व भरंवसा आपला आहे. तेथें विस्तारें ल्याहावें नलगे. राजश्री खंडो आवजी पुन्हां आपले दरबारीं साधनास लागले आहेत. ह्मणोन वर्तमान परस्परें आईकितों, त्यास, सर्व साधन करणें आपणाजवळ. त्याअर्थी आह्मी काळजी कशास करावी ? आह्मांकडील व सेनाखासखेल यांजकडील मजकूर मारनिले निवेदन करितील, त्याप्रमाणें बंदोबस्त करून देत असावा.