Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २६१

पौ छ ७ सवाल इहिदे.
श्री.
१७०२ आश्विन शुद्ध ९

हरीपंडत फडके सलमलाहुताला

सौ मेहेरबान करमफर्माय मखलिसां बादज षौक मुलाकत मसरत आयात इत्तीहाद माअरबाद येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेशा कलमी करीत यावें, दिगर, इंगरेजाचे तालुक मातबरगड किल्ले वगैरे घेऊन आर. काडापाशीं उतरलों असतां, चेनापटणाहून जेनराल मंडोर नामें सरदार दोन्ही हजार गोरे फिरंगी व आठसेहे तुरबस्वार व दाहा हजार बार व तीस तोफा सुधां लढाइचे इच्छेनें कंचीस आल्यावरून आह्मीं आरकाडाहून कूच करून कंचीस पोहचून त्याचे फौजेस घेरा दिल्हा असतां, फिरंगीचे कुमकेस गुंदुर व मछलीबंदराहून जनरल बेली नामें सरदार चारीसौंह गोरे फिरंगी व पांच हजार बार व बारा तोफा वगैरे जंगी सरंजाम येण्याची खबर पोहचतांच, त्याचे तंबीकरितां इकडूनही फौज पाठवून मारामारी करविल्यावरून ते जमियत पुढें येऊं न सकतां कंचीस चारी कोसाचे फांसलेनें गढीचा आसरा घेतले. त्याचे उपराळेस कंचीहून जेनराल मंडोरानें आपले इमराहि जमियेतपैकीं होष चुनिंदे पांचसें गोरे फिरंगी व शेंभरी तुरब सवार व निवडक दोन्ही हजार बार व पंधरा सरदार पालखीनिसीमसुद्धां कंचीहून पाठविले. करितां जनरल बेली नामें सरदार पहिले आपणापाशीं होते ते जमियत व कंचीहून गेले ते कुमकी फौजसहित जमाऊन भेऊन इकडील फौजेसी लढाई करीत येणेची खबर आल्यावरून त्याच वख्तीं आह्मी कंचीस आलों. ते कुलाह पोषाची फौजेवरही कित्येक फौज पाठवून खाशी फौज सुद्धां चालून जाऊन, मारामारी करून, जनरल बेलीचे फौजेस कतलआम केलें. खुद जनरल बेलीनामें सरदार याशिवाय मातबर मातबर पालखीनिशीन तीस सरदार व गोरे फिरंगी पाचेसह जित शाबूत सरकारांत दस्तगीर जाहले. पांचेसेहें फिरंगी व दोन हजार बार पावेतों मारले गेले. बाकी बार व तमाम बंदुका व बारा तोफा वगैरे कुल त्याचें लष्कराचें लष्कर लुटून घेतलें. हे खबर कंचीस आली. ते जनरोल मंडोर ऐकून आपले हमराही फौजसुद्धां रातचे वख्तीं फरारी जाहले, सबब, इकडून, भारी फौजा पाठविल्या. करितां यांस त्यांस लढाई होऊन जेनरल मंडोर याचे हमराही जमियत मारून घेतले. जेनराल मजकूर ताव आणतां न सकतां रादेत. आपले हमराही तोफा व रणगाडे व बारुतच्या पुटीया व बाटीर वगैरे सरंजाम टाकीत टांकीत दोन्ही तिन्ही हजाराचे जमियतेचे निसी कंचीहून आठ केसांवर, चेंगलपटनामें गढत त्याचा टाणा आहे, त्या गढीच्या आस स जाऊन पोहचला. इकडील फौजही त्याचा पिच्छा करीत जाऊन त्या ग. दास घेरली आहे. खुदाच्या फजलेकडून त्याचीही तंबी आनकरीव होईल. त्यास कलमी करणेत येईल, आपण दोस्त असा. याकरितां येथे लढाई ज्या प्रकारे जाहली, तो त्याच नसें प्रमाणे मफसल लिहून पाठविले असे, परभारेहा अखबारे करून जहुरांत येईल. हमेषा आपली घादमानी कलमी करीत यावें. ज्यादा लिहिणें काय असे ?