Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २६०
श्री.
१७०२ भाद्रपद वद्य १४
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसीः-
श्रीमंतसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो खंडेराव जाधव कृतानेक साष्टांग दंडवत. विनंती उपरी येथील कुशल ता छ २७ माहे रमजान मुा नजिक कासारबरी यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखन करावयाची आज्ञा केली पाहिजे. साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालों ते कोरेगांवीं भीमा उतरोन, निंबदेहेरचे घांटे टोक्यावर गंगा उतरोन, मुक्काम मजकुरीं येऊन दोन चार मुक्काम केलें. समागमें पथकें व पागा नेमणूक आहे. त्यांची मार्गप्रतीक्षा केली. परंतु अद्याप कोणीही आले नाहींत. आह्मी येथून घांट उतरोन जावें, तर खानदेशांत तापीतीरीं शंभूंचें प्राबल्य जालें आहे. महालोमहालचा आमल उतरून मामले निघाले. त्याजकडलि जमाव भारी आहे. यास्तव जलदानें जातां येत नाहीं. गांठ पडल्यास सरकारचा नक्ष राहून पारिपत्य जाहलें पाहिजे. याजकरितां पथकाची मार्गप्रतीक्षा येथेंच करीत असों. सेवेसीं वर्तमान श्रत व्हावें, ह्मणोन विनंती लिहिली आहे. पथकें रवाना करावयास हुजरे गेलेच आहेत, आणखी ताकीद होऊन रवाना लौकर जाले पाहिजेत. एक दोन ठाणीं त्यांणी घेतलीं आहेत. त्याजवर हल्ला करून जातांच ठाणीं घेतल्याशिवाय दाब पडणार नाहीं. येविशीं समक्ष विनंती केली होती, साहेबाची आज्ञा जाली कीं, मागाहून च्यार तोफाही रवाना करतों. त्याची रवानगी जाली असल्यास उत्तम. नसली जाली तरी सत्वर तोफा रवाना करावयाची आज्ञा जाली पाहिजे. विशेष काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हें विज्ञप्ति.