Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २४७

पौ मिती मार्गशीर्ष वद्य ४ रविवार रात्रौ.
श्री १७०१ मार्गशीर्ष शुद्ध अखेर

राजश्री बाळाजीनाईक स्वामीचे सेवेसीः-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार, येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण कार्तिक शुद्ध १ व सुध पंचमीचीं दोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिा सविस्तर अवगत जाहलें. चिरंजीव राजश्री नारोबानाना यांची काळजी न करावीं. आपल्यावर विश्वास, तेव्हां काळजी कशास करावी, हें तो खरेंच आहे. आमचा अभिमान आपणासच आहे. तेथें आह्मीं उपरोधिक काय ल्याहावे ? आपण आह्मांविशीं बहुत मेहनत करितात, ह्मणोन राजश्री बाळाजीपंतांनीं तपसिलें लिहिलें. त्यास आमचा विचार आपल्याशीं किमपी दुसरी नाहीं. ऐवजाचा भरणा होणें. येथील अर्थ पाहतां आपणांस काय ल्याहावें ! केवळ संकटाचे दिवस प्राप्त जाहले आहेत. चहूंकडून हंगाम एकच माजला आहे. सिबंदीचा पेंच फौज घरीं बसलियामुळें सिबंदी चडली. जलचर नजीक याचा विश्वास नाहीं. यामुळें घरीं बसून राहणें प्राप्त जाहलें. आतां तरी आपलीं पत्रें व सरकारचीं पत्रें आलीं कीं, तह बिघडला. यामुळें केवळ लोकांचे होश ठिकाणीं राहिलें नाहीं. मुलूख, प्रजन्य नाहीं यामुळें खराब जाहला. दुसरें में अरिष्ट उभें राहिलें. पुढें याचा विचार काय करावा? आपण आमचे वचनावर सरकारांत वचनीं गुंतलें. यास पार पाडणार श्री समर्थ आहे. आपण कांहीं चिंत्ता न करावी. ऐवजाचे तजावजींत असों. चिरंजीव राजश्री नाना आपणापाशीं आलियाचें वर्तमान जलदीनें लिहिलें पाहिजे. आमचा अभिमान सर्वप्रकारें आपणास आहे. या अर्थीं आह्मांस काळजी कोणे गोष्टीची नाहीं, येथील सविस्तर यजमानपत्रावरून कळेल. सारांश, ही दौलत वोढीखालीं बहुत आली आहे. कांहीं बाकी राहिली नाहीं. एक एक विघ्न नवेंच उभें राहतें. यांत ईश्वर लाज राखील ते खरी. सरांश, आह्मांस आपले पाशीं खरेपण राहिलें ह्मणजे सर्व जालें. वरकड सविस्तर मागाहून लिहून पा. चिरंजीवाचे येणें आपल्यापाशीं जालें न जाले हे कळत नाही. तरी सविस्तर लिहावें. न जाल्यास येणें होईल तें करावें. आपल्या विचारास करावयाचें तसें करावें. आह्मीं आपल्या आज्ञेशिवाय नाहीं. बहुत काय लिहिणे ? कृपा लोभ किजे. हे विज्ञप्ति.