Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २४९.

श्री.
पो मिति पौषशुा १२
श्री. १७०१ मार्गशीर्ष वद्य १०

श्रीमंत राजश्री बाळाजीनाईकनाना स्वामीचे सेवेसीः-

सेवक गोविंद गोपाळ सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता छ २३ माहे जिल्हेजपर्यंत वर्तमान येथस्थित जाणोन स्वकीयें कुशल लेखन करीत असावें. विशेष. सांप्रत आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं त्यास सविस्तर लेहून संतोषवीत जावें. इकडील वृत्त पेशजीं लिहिलें आहे त्यावरून कळों आलें असेल. वरकड साद्यंत यजमान साहेबांचे पत्रावरून विदित होईल. सर्व प्रकारें भरंवसा आपला आहे. चिंरजीव राजश्री नारो गोपाळ योजविसीं आपणांस बहुत लिहिलें. परंतु सरकारांत चार गोष्टी सांगून त्याची रवानगी न जाली. या कार्याची आपणापासून दिवसगत न लागावी. या उपरी सत्वर मार्गस्त करावें, विस्तार ल्याहावा ऐसें नाहीं. तेथें बहुत उपद्रव मांडिला आहे. आपणास कळतच असेल. सारांश, सरकारलक्षांत एकनिष्ठपणें असतां तेथें ऐसा विचार नसावा. असो. आपण श्रम करितां कमी करीत नाहीं. तेव्हां आमचे दैवयोग. आपण काय करितील ? वरकड इकडील मजकुर तरी जलचर सामान सरंजाम करून तयार जाले आहेत. बोलवा व मसलतांतील तो विचार उत्तरदिशेची आहे. घांट व मार्ग इकडील व दक्षिणेकडील कोंडाईवारी व सेंदव्याचा वगैरे तमाम पाहावयासीं गेले आहेत. बारा बेलदार लाऊन नर्मदाचा घांट नीट करावयासीं गेले आहेत. गुंता तयारींत काडीमात्र नाहीं. आपलेकडील भरंवसा धरावा, तर यावेळपावेतों दृष्टोत्पत्तीस कांहीं येत नाहीं! आह्मांस तों तीन जागा सांभाळणेः-एक नर्मदाउत्तरतर, दुसरें दक्षिणतीर, व महीउत्तरतीर तीन्ही ठिकाणीं त्याचा शेजार एक ठिकाणीं असल्यास चिंता नाहीं. सर्व शत्रुपण माथां आलें आहे. दुसरेकडील येथील भरंवसा बाळगावा तरी कळतच आहे ! शहरचा कारभार सावकारी आहे. ऐशियासीं तिकडून कोंडाईकडून आगमन सुरतप्रांती अति सत्वर जाल्यास उत्तम आहे. ह्मणजे उत्तरतीराकडील काळजी नाहीं. जैसें करणें तैसें घडेल. हे गोष्टीस दिवसगत लागली तर दोष न ठेवावा. मग जैसें घडावयाचें असेल तैसें घडेल. सारांश, येथील लक्ष तुह्मासिवाय नाहीं. खातरजमा असों द्यावी. परिणाम मात्र शुद्ध व्हावा नाहींतर एकहि साधन नाहीं. ऐसें जाहल्यास मग विचार कळतच आहे. दुसरें चंदरराव पवार यांचें पारपत्य होऊन पेटलाद व आमोद येथील ठाणीं सरकारचीं बसविलीं. आमोदेस सरंजाम आपले कडील आहे. कारण, कादार यांचे मतें असावा. नाहीं तर कादार यांच्याने ठिकाण धरून रहावत नाहीं. कारण मित्र नजीक शेजार. याजकरितां याप्रों करून बंदोबस्त केला आहे. कादार यांचे विचारें सरंजाम बोलावणें जाहल्यास बोलाऊन घेऊ. पवार नर्मदा उतरून अंकलेश्वरीं पोंचले. तेथून पुढां जाणार. जातील. जातेसमयीं आपलेकडील माहाल व सराइ येथील वोळी धरून नेल्या व गुरें ढोरें घेऊन गेले ! माहालाची खराबी बहुत केली. पुढां सुरतेकडे जावें या मनसब्यांत त्यास, त्यांचे यजमानाचें पत्र आलें की, तेथेंच राहावें. सरंजाम तोफा वगैरे पायदळ आणखी रा करणार. ऐसी बातमी आली. तेव्हां आणवी उपद्याप करावयाचा मनसबा आहे. मग जें घडेल तें पाहावें. रा लक्षमणराव चिटनिस यांसी रजा दिली. ठाणीं कांहीं उठविली. आण आपले कडील जलचर यांणी पा व पाठवणार. मारनिले तेथें आल्यावर सविस्तर समजण्यांत येईल. सारांश, तिकडून आगमन लौकर व्हावें. म्हणजे सर्व गोष्टी उत्तम आहे. बहुत काय लिहिणें ? कृपा करावी. हे विज्ञप्ति.