Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २४८
श्री.
११७०१ मार्गशीर्ष वद्य ९
राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर गोसावी यासीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो हरी बल्लाळ आशीर्वाद. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपणाकडून पत्रें येतात व राजश्री बाळाजीनाईकनाना सांगतात, त्यावरून सविस्तर कळतें. इकडील कित्तेक मजकूर लोकवार्ता ऐकोन चित्त संशयाविष्ट होत असेल. त्यास, श्रीमंत नानाची कायम मिजाज आहे ? जो आपल्याशीं करार आहे त्यांत दुसरी गोष्ट होणार नाहीं. येविसीं पुर्तेपणीं खातरजमा असावी. आपले दवलतीचें कल्याण व्हावें हेंच इच्छा व तत्प्रत्युक्त साधन तेंच करितों, आपण श्रीमंत राजश्री रावसाहेब यांचे पायांशी एकनिष्ठ. तेव्हां, दुसरेसारखी गोष्ट कैसी घडेल ! कोणी कित्तक बनाऊन सांगतील त्यांजवर न जावें. जो येथील खंबीर आहे, तो बळकट आहे. चिंता न करावी. येविशीं बाळाजीनाईकनाना लिहितील त्यावरून कळेल. रा छ २२ जिल्हेज, बहुत काय लिहिणें, आह्मीं येथें असतां आपण कोणेविसीं चिंता न करावी. हे विनंती.