मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २५०

श्री
१७०१ पौष शुद्ध

श्रीमंत राजश्री नाईक स्वामीचे सेवेसीः-

विनंती सेवक नारायणराव गोविंद मो जामगांव सां दंडवत विज्ञापना ता पौष शुद्ध त्रितिया इंदुवासरे प्रहर रात्र पावेतों स्वामीचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपली आज्ञा घेऊन स्वार जालों, ते शनवारीं येथें दाखल जालों. रविवारीं श्रीमंत पाटीलबावांची भेट घेतली. त्याचा कित्तेक मार तपशीलवार राजश्री बाळाजीपंतनाना बक्षी यांचे पत्रीं लिहिला आहे. त्याजवरून श्रुत होईल. पत्रीं मार लिा आहे, त्याजप्रमाणें सरकारचे पत्राचा डौल यांचे नांवाचा तयार करून आधीं पाठवावा. याचा निग्रह आहे, ऐसें नाहीं. ममतेच्या विचारे सर्व आपले कृपेंकरून होऊन येईल. पत्रदर्शनीं विनंती लिहिल्याप्रमाणे पत्रे पाठऊन द्यावीं. बहुत काय लिहिणे ? कृपा असों दिजे. हे विनंति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries