Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २४३

श्री
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध १०

श्रीमंत राजश्री बाळाजीनाईकनाना भिडे स्वामींचे रोवेसीः-

विनंति उपरी. तुह्मीं पत्र मार्गशीर शुद्ध ४ रविवारचें पा तें मंदवारीं दोन प्रहर रात्रीस पावलें. सातवे रोजीं पावलें. लिहिला मजकूर कळों आला, अटकेंत असतां पत्रें कशीं येतात, ह्मणून लिा. चवकशी तो बहुत आहे. परंतु हें कलियुग ! लहान माणसास द्रव्य दाखीवल्यास न करावयाचें कर्म करितात. यजमान व ते एक जाहले ह्मणून लिा. त्यास, येथें तों कांहींच नाहीं. तेथे आपल्यास प्रत्ययास कैसें आलें, त्याचा शोध पुर्तेपणीं करून लिहून पाठवावें. एरवीं शिके तो असामींवार त्याजपाशीं आहेत. अक्षरें दुस-यासारखीं काढून मधील मध्यें कमें आजपर्यंत करीत आले आहेत. तेहि त्यांचे नित्यांतील आहेत. याजकरितां खरें खोटें कोठून आहे, हें समजलें पाहिजे. याजकरितां चिठी पत्नीं ठिकाणीं पाडावी. यजमान आम्ही बाहेर निघालों. तेथें होते तों दबाब होता. मागें राहणार नाहीं, बखेडा होईल, याजकरितां उभयतां बंधु मार्गशीर शुद्ध ३ चे दिवशीं अलंकार करून केशवराव देशमुख आले होते. त्याजसमागमें सरंजाम देऊन वडनगरास रवाना केलें. तेथें पोंचलेयाचे आपणास पत्र आलें नाहीं. येईल. समागमें आपलेकडील खिजमतगार, ब्राह्मण, कारकून आरबांच्या बैरखा नेहमीं दोन दिल्या आहेत. याशिवाय पोंचवावयाकरितां पागा वगैरे सरंजाम दिल्हा आहे. तो अद्याप आला नाही. कळावें. येविशींची खातरजमा असों द्यावी. आमचा प्राण गेल्यावर मग जें घडणें तें घडेल. आह्मी तुह्मी एकच भाईबंद, स्नेही, धणी, सर्व आपली जोड केली आहे. वरकड त्याग न करितां करणें प्राप्त जाला आहे. तेव्हां आपलेशिवाय दुसरा विचार नाहीं. यजमानानीं लिा आहे, त्याजवरून कळेल. मिती मार्ग शीर शुद्ध १० मंदवार प्रातःकाळ. हे विज्ञप्ति.