Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २४६

पौरा छ १० जिल्हेज
श्री.
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध ११

रावसो मेहेरबान करमफर्माय मोखलिस बाळाजी पंडत फडनवीस सलमलाहुताला.

बादज पाकै मुलाखत मसरत आयात हत्तीहाद आअरबाद येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेषा कलमी करीत आलें पाहिजे. दरींविला, बरखुरदार सादत व एकबार तशिांकरीम साहेब यांस सावणूरचा नबाब अबदुल हमीदखान याचे लडकीची निसबत मोरर पाहून नेमदीन छ २५ जिल्कादीं शादीची तारीख मुकरर जाहली आहे. हे खुषी आपले असे, याकरितां कलमीं केलें जातें जे आपण येऊन शादीची खुषी नजरेनें पाहून दिलशाद वे दोस्तीची तरक्की केली पाहिजे, हमेष आपली षादमानीस निगारस करवीत यावें. जियादा लिहिणें काय असे ?